Nithin Kamath BMC Elections: महाराष्ट्रात आज १५ जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणुकीमुळे शेअर बाजारामध्ये कोणतेही कामकाज होत नाहीये. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांनी या दिवशी पूर्णपणे 'ट्रेडिंग सुट्टी' जाहीर केली आहे. मात्र, या निर्णयावर देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्म 'झिरोदा'चे (Zerodha) सह-संस्थापक नितीन कामथ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांनी याला 'खराब नियोजन' म्हटलंय.
आधी फक्त सेटलमेंट हॉलिडे होता, नंतर पूर्ण सुट्टी दिली
सुरुवातीला एक्सचेंजनं हा दिवस केवळ 'सेटलमेंट हॉलिडे' म्हणून घोषित केला होता, ज्याचा अर्थ असा की फक्त पैसे आणि शेअर्सची देवाणघेवाण बंद राहणार होती. परंतु गेल्या आठवड्यात एक्सचेंजने नवीन परिपत्रक जारी करून सांगितले की, राज्यात बँकांना सुट्टी असल्यानं आता ट्रेडिंग पूर्णपणे बंद राहील.
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
"ग्लोबल मार्केटच्या युगात अशा सुट्ट्या अयोग्य"
नितीन कामथ यांनी म्हटलं की, "कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण मार्केट बंद करणं तर्कसंगत नाही." भारतीय बाजारपेठ आता जागतिक व्यवस्थेशी (Global System) जोडली गेली आहे, अशा परिस्थितीत या प्रकारच्या सुट्ट्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसमोर भारताच्या प्रतिमेवर परिणाम करतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
कामथ यांनी दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे सहकारी आणि बर्कशायर हॅथवेचे माजी उपाध्यक्ष चार्ली मुंगेर यांचा संदर्भ देत लिहिलं की- "मला इन्सेंटिव्ह दाखवा आणि मी तुम्हाला आऊटकम दाखवेन."
'भारताला जागतिक मानकांची गरज'
बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा वेळी वारंवार स्थानिक सुट्ट्यांमुळे मार्केट बंद राहिल्यानं परदेशी फंड हाऊसेसना हेजिंग आणि ट्रेडिंगमध्ये अडचणी येतात. मात्र, मतदानाच्या दिवशी कर्मचारी आणि मतदारांना सुविधा देणे आवश्यक आहे, असा सेबी आणि सरकारचा तर्क असतो.
MCX वर संध्याकाळी कामकाज सुरू होईल
शेअर बाजार दिवसभर बंद असला तरी 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर अंशतः काम होईल. सकाळच्या सत्रात मतदानामुळे ट्रेडिंग बंद आहे, परंतु संध्याकाळी सोने आणि चांदीसारख्या बुलियन कॉन्ट्रॅक्ट्समध्ये ट्रेडिंग होईल. काही कृषी-कमोडिटीजमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत ट्रेडिंगची परवानगी देण्यात आली आहे.
'सेटलमेंट हॉलिडे' म्हणजे काय?
ट्रेडिंग हॉलिडे आणि सेटलमेंट हॉलिडे मधील फरक सोप्या भाषेत सांगायचा तर: 'ट्रेडिंग हॉलिडे'मध्ये शेअर्सची खरेदी-विक्री करता येत नाही. तर 'सेटलमेंट हॉलिडे'मध्ये ट्रेडिंग सुरू असतं, परंतु तुमच्या डिमॅट खात्यात शेअर्स येण्याची किंवा विकलेल्या शेअर्सचे पैसे येण्याची प्रक्रिया थांबते.
Web Summary : Nithin Kamath criticizes closing the stock market for local elections, deeming it "poor planning" given global integration. He argues such holidays impact India's image with international investors, suggesting standardizing market practices.
Web Summary : नितिन कामथ ने स्थानीय चुनावों के लिए शेयर बाजार बंद करने की आलोचना की, इसे 'खराब नियोजन' बताया। उनका तर्क है कि ऐसी छुट्टियां अंतरराष्ट्रीय निवेशकों के सामने भारत की छवि को प्रभावित करती हैं, इसलिए बाजार प्रथाओं का मानकीकरण होना चाहिए।