Join us

केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:04 IST

kedarnath helicopter crash : रविवारी सकाळी केदारनाथमधील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. विमानात पायलट आणि एका मुलासह आणखी ५ जण होते.

kedarnath helicopter crash : उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धाम यात्रा देशभरातील भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक बाबा केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. डोंगराळ आणि कठीण मार्गांमुळे इथे हेलिकॉप्टर सेवेची मागणी खूप वाढली आहे. विशेषतः वृद्ध आणि कमी वेळ असलेल्या प्रवाशांसाठी ही एक सोयीची सेवा बनली आहे. मात्र, रविवारी सकाळी केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यात पायलट आणि एका मुलासह एकूण ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

केदारनाथ हेलिकॉप्टरचे भाडे किती?केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा फाटा, सिरसी आणि गुप्तकाशी यांसारख्या हेलिपॅडवरून उपलब्ध आहे. या हेलिकॉप्टरचे भाडे सरकार निश्चित करते आणि दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी ते जाहीर केले जाते.

फाटा ते केदारनाथ (फेरीचे भाडे): प्रति व्यक्ती ५,५०० ते ६,००० रुपये

  • सिरसी ते केदारनाथ: प्रति व्यक्ती ५,००० ते ५,८०० रुपये
  • गुप्तकाशी ते केदारनाथ: प्रति व्यक्ती ७,५०० ते ८,००० रुपये
  • हे भाडे एका व्यक्तीच्या राउंड ट्रिपसाठी (येण्या-जाण्यासाठी) आहे. मुलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हेच दर आहेत. मात्र वजनाच्या मर्यादेकडे विशेष लक्ष दिले जाते.

हेलिकॉप्टर अपघात झाल्यास कोणती भरपाई मिळते?हेलिकॉप्टर अपघात ही दुर्दैवी घटना असली तरी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्यांकडे अशा परिस्थितीसाठी काही निश्चित नियम आणि विमा योजना आहेत.

  • मृतांच्या कुटुंबियांना भरपाई: अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना ऑपरेटरच्या धोरणानुसार विमा कंपन्यांकडून ५ लाख ते २० लाखांपर्यंतची भरपाई मिळू शकते.
  • जखमी प्रवाशांना मदत: जखमी प्रवाशांना वैद्यकीय खर्च आणि भरपाई दिली जाते, ज्याची रक्कम वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असू शकते.
  • विमा अनिवार्य: प्रत्येक ऑपरेटरने प्रवाशांसाठी वैध विमा असणे अनिवार्य आहे.

वाचा - मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!

अलीकडेच आर्यन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर, भरपाई प्रक्रियेवरील चर्चा पुन्हा तीव्र झाली आहे. त्याचबरोबर, अहमदाबादमध्ये झालेल्या मोठ्या विमान अपघातानेही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या नियमांवर आणि भरपाईच्या पद्धतींवर नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. सरकार आणि प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची तयारी करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा घालता येईल.

टॅग्स :केदारनाथहेलिकॉप्टर दुर्घटनाविमान दुर्घटनाअपघात