Join us
Daily Top 2Weekly Top 5

Justin Trudeau News : जस्टिन ट्रुडो किती संपत्तीचे मालक? भारत आणि कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वेतनात किती फरक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:27 IST

Justin Trudeau News : जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडो हे कॅनाडातील अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

Justin Trudeau News : जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ट्रुडो हे कॅनडातील अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. २०२४ मध्ये त्यांची संपत्ती ९.६ मिलियन डॉलर (सुमारे ८२२ कोटी रुपये) होती. पंतप्रधान म्हणून त्यांचा वार्षिक पगार ३,७९,००० डॉलर (सुमारे ३.२४ कोटी) होता. म्हणजे महिन्याला सुमारे २७ लाख रुपये. परंतु, गुंतवणूक आणि व्यवसायातून मिळणारं त्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे. ट्रुडो यांना त्यांच्या कुटुंबाकडून मोठा वारसा मिळाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पगार आणि संपत्तीशी तुलना केली तर मोदींचं वेतन कमी आहे, पंतप्रधान मोदींना दरमहा १.६६ लाख रुपये पगार मिळतो. यात खासदार भत्ता ४५ हजार, खर्च भत्ता ३ हजार, दैनंदिन भत्ता दोन हजार आणि मूळ वेतन ५० हजार रुपये यांचा समावेश आहे. इतर सर्व खर्च वगळून पीएम मोदींना केवळ ५० हजार रुपये बेसिक पगार मिळतो. पंतप्रधान मोदींकडे ३.०२ कोटींची संपत्ती आहे. लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला होता.

ट्रुडो श्रीमंत राजकारण्यांपैकी एक

जस्टिन ट्रुडो यांचे वडीलही कॅनडाचे पंतप्रधान राहिले आहेत. ट्रुडो हे जगातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. वडिलांकडून त्यांना ४० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कौटुंबिक मालमत्ता वारशाने मिळाली आहे.

फोर्ब्सनुसार, ट्रुडो यांच्या संपत्तीत रिअल इस्टेट आणि सरकारी सिक्युरिटीजमधील २२ दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. रेडिटवरील एका अज्ञात युझरनं दिलेल्या माहितीनुसार, ट्रूडो यांच्याकडे जागतिक कंपन्यांमध्ये ७० लाख डॉलर्सचे शेअर्स आहेत. कॅनडाच्या कायद्यानुसार ट्रुडो यांना थेट शेअर्समध्ये व्यवहार करण्यास मनाई आहे. परंतु, अप्रत्यक्ष मार्गानं त्यांची गुंतवणूक असल्याचं म्हटलं जातंय.

२ यॉट आणि लक्झरी कार्स

ट्रुडो यांचा शेअर पोर्टफोलिओ गेल्या २० वर्षांत दरवर्षी ४८ टक्क्यांनी वाढला आहे, तर सामान्य गुंतवणूकदारांसाठी तो ११ टक्के आहे. तज्ञांचं मत आहे की कंपनीबद्दल अंतर्गत माहिती असल्याशिवाय अशी असामान्य वाढ शक्य नाही.

जस्टिन ट्रुडो यांच्याकडे २ यॉट असल्याचं म्हटलं जातं. त्यांची किंमत ३ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ट्रुडो २४ ससेक्स ड्राइव्ह येथील अधिकृत पंतप्रधाननिवासस्थानी राहत आहेत. पण, ओटावामध्ये त्यांचं ११ बेडरूमचं आलिशान घर आहे. या हवेली व्यतिरिक्त ट्रुडो यांच्याकडे आणखी ४ घरे आणि एक गोल्फ कोर्स आहे. १९७२ मध्ये झालेल्या एका लिलावात त्यांनी एक फेरारी ७ लाख डॉलर्सला विकत घेतली होती. ट्रुडो यांच्या संपत्तीत दोन रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, एक लिंकन, दोन रेंज रोव्हर्स, दोन मॅकलारेन आणि एक बुगाटी यांचा समावेश आहे.

टॅग्स :कॅनडाजस्टीन ट्रुडो