Join us

१० डिसेंबरला खुला होणार 'हा' SME IPO, ग्रे मार्केटमध्ये १०४% वर पोहोचला GMP 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:37 IST

Jungle Camps India IPO: कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. हा आयपीओ १० डिसेंबरला खुला होणार आहे.

Jungle Camps India IPO:  जंगल कॅम्प्स इंडियाचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. कंपनीचा आयपीओ १० डिसेंबरला खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना १२ डिसेंबरपर्यंत कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. सध्याचा जीएमपी १० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. लिस्टिंगच्या दिवशी कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकते, अशी अपेक्षा आहे.

प्राईज बँड किती?

जंगल कॅम्प्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर ६८ ते ७२ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं एकूण १६०० शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख १५ हजार २०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. बीएसई एसएमईवर कंपनीची लिस्टिंग १७ डिसेंबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे.

१०४% वर जीएमपी

या एसएमई कंपनीच्या आयपीओचा जीएमपी ७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, कंपनीचा आयपीओ आज ग्रे मार्केटमध्ये ७५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. जे कंपनीच्या प्राइस बँडपेक्षा जास्त आहे. लिस्टिंगच्या दिवशी हा ट्रेंड दिसला तर कंपनीचा आयपीओ पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करेल. गेल्या काही दिवसांपासून कंपनीचा जीएमपी बदललेला नाही.

जंगल कॅम्प्सच्या आयपीओची साईज २९.४२ कोटी रुपये होता. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४०.८६ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स जारी केले जाणार नाहीत.

काय करते कंपनी?

२००२ मध्ये जंगल कॅम्पची स्थापना करण्यात आली. कंपनी वाईल्ड लाईफ कॅम्प्स, हॉटेल्स, मोटेल्स, गेस्ट हाऊस, हॉलिडे होम, हेल्थ क्लब, केटरिंग हाऊस आणि रेस्टॉरंट्स चालवते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल १८१०.६१ कोटी रुपये होता. कर भरल्यानंतर कंपनीला ३५९.१६ कोटी रुपयांचा नफा झाला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक