Join us

उत्पादन वाढल्याने नोकऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:08 IST

Jobs: ग्राहकांकडून वाढलेली मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता सुधारल्याने देशातील उत्पादनक्षेत्रात चांगली सुधारणा दिसून आली आहे.  पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) वाढून ५६.०वर पोहोचला.

नवी दिल्ली - ग्राहकांकडून वाढलेली मागणी आणि कच्च्या मालाची उपलब्धता सुधारल्याने देशातील उत्पादनक्षेत्रात चांगली सुधारणा दिसून आली आहे.  पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) वाढून ५६.०वर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये पीएमआय ५५.५ इतका होता. सलग २९ महिने भारताचा पीएमआय ५० पॉइंटपेक्षा अधिक आहे. ५० पेक्षा अधिक असलेला पीएमआय वाढ दर्शवतो, तर ५० पेक्षा कमी असलेला इंडेक्स गती कमी झाल्याचे सूचित होते. एस ॲण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या आर्थिक सहयोगी संचालक पोलियाना डी लीमा म्हणाल्या की, देशातील स्थिती उत्पादनवाढीसाठी अनुकूल आहे. अधिक मागणी असल्याने जादा रोजगार निर्माण होणार आहेत. भविष्यासाठी हे चित्र सकारात्मक आहे.

टॅग्स :नोकरीकर्मचारीव्यवसाय