Join us

जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ११ महिन्यांची वैधता; मिळताहेत अनलिमिडेट बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:55 IST

Reliance Jio Recharge Plans: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतांश मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत.

Reliance Jio Recharge Plans: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतांश मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्ससाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लान ऑफर करते. जिओच्या लिस्टमध्ये अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान आहेत. यासोबतच जिओला स्वस्तापासून ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन मिळणार आहेत. जिओच्या चांगल्या ऑफर्स आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लानमुळे जिओ भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.

आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात युजर्सला अतिशय कमी किंमतीत दीर्घ वैधतेसह अनलिमिटेड बेनिफिट्स मिळतात. जिओचा हा प्लान ३३६ दिवसांची म्हणजेच पूर्ण ११ महिन्यांची वैधता घेऊन येतो. तर हा प्लॅन तुम्ही ९०० रुपयांपेक्षा कमी म्हणजेच फक्त ८९५ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी.

जिओचा ८९५ रुपयांचा प्लान

जिओच्या ८९५ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची दीर्घ वैधता मिळते. ३३६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण २४ जीबी डेटा आणि एकूण ६०० फ्री एसएमएसचा लाभ दिला जातो.

फक्त या युजर्सना फायदा

जिओचा ८९५ रुपयांचा हा स्वस्त प्लान जिओच्या सर्व युजर्ससाठी नाही. जिओचा हा प्लान फक्त जिओ फोन युजर्ससाठी आहे, म्हणजेच ज्यांच्याकडे जिओ फोन आहेत तेच या प्लानचा लाभ घेऊ शकतात.

टॅग्स :रिलायन्स जिओ