Join us  

Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 4:07 PM

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे.

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. बीएसएनएलच्या नवीन ऑफरचे नाव FIFA वर्ल्ड कप स्पेशल डेटा STV 149 असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिफा वर्ल्डकपच्या दरम्यान बीएसएनएलचा हा प्लॅन मर्यादित असेल. म्हणजेच, ग्राहकांना या प्लॅनचा फायदा 14 जून ते 15 जुलैपर्यंत घेता येणार आहे. बीएसएनएलने हा प्लॅन रिलायन्स जिओच्या 149 प्लॅनला टक्कर देण्यासाठी बाजारात आणला आहे. रिलायन्स जिओने आता रोज अतिरिक्त 1.50 जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 149 रुपयांचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना दररोज 3 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. यासोबतच कॉल आणि एसएमएस सुद्धा करता येणार आहेत. तर 799 रुपयांच्या रिचार्जवर सर्वाधिक 6.50 जीबी डेटा रोज मिळणार आहे. बीएसएनएलचा 146 रुपयांचा हा प्लॅन आजपासून लागू करण्यात आला आहे. बीएसएनएलची सेवा देशभरात आहे, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. दरम्यान, एअरटेलनेही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये अशाच प्रकारची ऑफर दिली होती. कोणत्याही प्लॅनच्या वैधतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जिओ वापरकर्त्याला पहिल्याप्रमाणेच अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रत्येक दिवशी 100 मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यानं दिवसाला 3 जीबी डेटा संपवल्यास त्याचं नेट सुरूच राहणार असून, स्पीड कमी होणार आहे.  

टॅग्स :बीएसएनएलमोबाइलरिलायन्सरिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशनएअरटेलपतंजली