Join us

Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:29 IST

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतेक मोबाईल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्सना अनेक चांगले रिचार्ज प्लान्स देते.

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतेक मोबाईल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्सना अनेक चांगले रिचार्ज प्लान्स देते. जिओकडे प्रत्येक प्रकारच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लान आहेत. यामध्ये दीर्घ वैधतेपासून ते अमर्यादित डेटापर्यंतचे रिचार्ज प्लान समाविष्ट आहेत. जर तुम्ही देखील जिओ युजर असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटासह दीर्घ वैधतेचा फायदा मिळेल. चला जाणून घेऊया.

जिओचा ८९९ रुपयांचा प्लान

जिओचा ८९९ रुपयांचा प्लान ९० दिवस म्हणजेच ३ महिन्यांच्या वैधतेसह येतो. ३ महिन्यांच्या या प्लानमध्ये युजर्सना अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सना २० जीबी अतिरिक्त डेटाचाही फायदा मिळतो. यासोबतच, या प्लानमध्ये जिओ एआय क्लाउड आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस देखील समाविष्ट आहे.

दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

जिओचा ९४९ रुपयांचा प्लान

जिओचा ९४९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांच्या या प्लानमध्ये युजर्सना अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सना जिओ एआय क्लाउड आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस देखील मिळतो.

जिओचा १२९९ रुपयांचा प्लान

जिओचा १२९९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सना जिओ एआय क्लाउड आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस देखील मिळतो. यासोबतच, या प्लानमध्ये नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओजिओ