Join us

Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:44 IST

Reliance Jio Recharge : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी युजर्स जिओशी जोडलेले आहेत.

Reliance Jio Recharge : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्ससाठी नवनवीन आणि चांगले प्लॅन लाँच करत असते. आता जिओनं आपल्या युजर्ससाठी एक नवा आणि जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओचा हा नवा रिचार्ज प्लॅन खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना जास्त डेटाची गरज आहे. जाणून घेऊया जिओच्या या नव्या रिचार्ज प्लॅनबद्दल.

जिओच्या नव्या रिचार्ज प्लानची किंमत ६०१ रुपये आहे. ६०१ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्ही अनलिमिटेड डेटाचा लाभ घेऊ शकता. हा प्लॅन तुम्ही इतर कोणत्याही जिओ युजरला गिफ्ट करू शकता.

जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन

जिओच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो केवळ त्याच प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटाही मिळतो. जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स संपूर्ण १ वर्षासाठी अनलिमिटेड ५जी डेटाचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये युजर्सला १२ डेटा व्हाउचर मिळतात. व्हाउचरची किंमत ५१ रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्स आता डेली १.५ जीबी डेटा असलेल्या प्लॅनमध्येही अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा घेऊ शकतात. हा प्लॅन जिओचा एक प्रकारचा डेटा व्हाउचर प्लॅन आहे, जो १ वर्षासाठी वापरला जाऊ शकतो.

जिओचा हा प्लॅन फक्त तेच युजर्स वापरू शकतील ज्यांच्याकडे ५जी फोन आहे आणि त्यांच्या भागात ५जी नेटवर्क उपलब्ध आहे. याशिवाय हा प्लॅन वापरण्यासाठी युजरकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह प्लॅन असणं आवश्यक आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओ