Reliance Jio Mobile Subscriber Base : रिलायन्स जिओने उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या सर्कलमधील दूरसंचार क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये जिओच्या नेटवर्कचा वापर करणाऱ्या मोबाइल ग्राहकांची संख्या वाढून २ कोटी ५१ लाखांवर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने नुकत्याच जारी केलेल्या दूरसंचार सबस्क्रिप्शन डेटा मधून ही माहिती समोर आली आहे.
TRAI च्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये रिलायन्स जिओच्या नेटवर्कमध्ये दोन लाखांहून अधिक नवीन मोबाइल ग्राहक जोडले गेले. याउलट, त्याच काळात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला मोठे नुकसान झाले आहे.
एअरटेल आणि VI चे मोठे नुकसान
| कंपनी | नवीन ग्राहक वाढ/घट (सप्टेंबर २०२५) |
| रिलायन्स जिओ | २ लाख+ ग्राहक जोडले |
| भारती एअरटेल | १३ हजार ग्राहक गमावले |
| व्होडाफोन आयडिया | १.८८ लाख ग्राहक गमावले |
| बीएसएनएल | ६७ हजार नवीन ग्राहक जोडले |
जिओ नंबर वन, एअरटेल दुसऱ्या स्थानावरउत्तराखंड आणि यूपी वेस्ट सर्कलमध्ये जिओने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. जिओचा सध्याचा ग्राहक आधार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअरटेलपेक्षा तब्बल ६३ लाख ग्राहकांनी जास्त आहे.
| कंपनी | एकूण मोबाइल ग्राहक (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) | क्रमांक |
| रिलायन्स जिओ | २.५१ कोटी (सर्वाधिक) | १ |
| भारती एअरटेल | १.८८ कोटी | २ |
| व्होडाफोन आयडिया | १.३९ कोटी | ३ |
| बीएसएनएल | ०.५२ कोटी | ४ |
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या सर्कलमध्ये एकूण वायरलेस (मोबाइल) ग्राहकांची संख्या अंदाजे ६.३० कोटी इतकी होती.
होम ब्रॉडबँडमध्येही जिओच पुढेमोबाइल सबस्क्रिप्शनसोबतच, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश सेवा क्षेत्रात होम ब्रॉडबँड सेगमेंटमध्येही जिओने आघाडी घेतली आहे.
जिओचा एकूण ब्रॉडबँड ग्राहक आधार: १४.७८ लाख+ ग्राहक.विभाजन: यात ८.०७ लाख जिओ फायबर आणि ६.७१ लाख जिओ एअर फायबर युजर्सचा समावेश आहे.रिलायन्स जिओने २०१६ मध्ये आपली 4G सेवा सुरू केली होती, ज्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात डेटा क्रांती झाली आणि जिओ देशातील सर्वात मोठे मोबाइल नेटवर्क बनले.
Web Summary : Jio leads in Uttarakhand & UP West with 2.51 crore users. Airtel and Vodafone Idea lost subscribers in September 2025, while Jio gained. Jio leads in broadband too.
Web Summary : उत्तराखंड और पश्चिमी उत्तर प्रदेश में जियो 2.51 करोड़ यूजर्स के साथ आगे है। सितंबर 2025 में एयरटेल और वोडाफोन आइडिया को नुकसान हुआ, जबकि जियो को फायदा। ब्रॉडबैंड में भी जियो आगे।