Join us

Jio नं आणला ११ महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनेक बेनिफिट्स; किंमतही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:41 IST

Reliance Jio News : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. देशातील कोट्यवधी युजर्स रिलायन्स जिओशी जोडलेले आहेत.

Reliance Jio News : मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. देशातील कोट्यवधी युजर्स रिलायन्स जिओशी जोडलेले आहेत. जिओने आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे प्लॅन आणलेत. जिओमध्ये सर्व प्रकारचे स्वस्त आणि महागडे प्लॅन पाहायला मिळतात. मात्र, जुलैमध्ये जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. असं असूनही कोट्यवधी युजर्स अजूनही जिओशी जोडलेले आहेत.

जिओ आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणत आहे. आता जिओने आपल्या लिस्टमध्ये आणखी एका परवडणाऱ्या प्लॅनची भर घातलीये. जिओचा हा प्लॅन त्या युजर्ससाठी बेस्ट ठरेल जे लॉन्ग व्हॅलिडिटी रिचार्जला पसंती देतात. जिओचा हा नवा रिचार्ज ११ महिन्यांच्या वैधतेसह येतो. ११ महिन्यांच्या वैधतेसह हा प्लॅन तुम्ही फक्त १८९९ रुपयांत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या प्लानमध्ये युजर्सला कोणते बेनिफिट्स मिळतात.

जिओचा १८९९ रुपयांचा प्लान

१८९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण ११ महिन्यांच्या वैधतेसह कोणत्याही नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसंच दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात. डेटाबद्दल सांगायचं झालं तर या प्लॅनमध्ये युजर्सला संपूर्ण वैधतेदरम्यान २४ जीबी डेटा मिळतो. दीर्घ वैधतेत परंतु कमी डेटा असलेला हा प्लॅन इंटरनेटसाठी वाय-फाय वापरणाऱ्या युजर्ससाठी उत्तम असेल. 

जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्हीचा फ्री अॅक्सेस मिळतो. परंतु यामध्ये अनलिमिडेट ५जी नेटवर्कचा अॅक्सेस मिळत नाही.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानी