Join us

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना ताज महाल पॅलेस हॉटेलचा आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 03:37 IST

जेट एअरवेज खरेदी करण्याची टाटा समूहाची संधी हुकली असली तरी जेटच्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे ओढण्याची संधी मात्र टाटा समूह सोडणार नाही, असे दिसतेय.

मुंबई : जेट एअरवेज खरेदी करण्याची टाटा समूहाची संधी हुकली असली तरी जेटच्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे ओढण्याची संधी मात्र टाटा समूह सोडणार नाही, असे दिसतेय. टाटा समूहाच्या मालकीच्या ‘ताज महाल पॅलेस हॉटेल’ने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून जेटच्या कर्मचाºयांना आपल्या सेवेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.सूत्रांनी सांगितले की, ताजचा विस्तार करण्याची टाटा समूहाची योजना आहे. त्यासाठी कंपनीला गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ हवे आहे. जेट एअरवेजच्या कर्मचाºयांकडे कंपनीला आवश्यक असलेली कौशल्ये आहेत. त्यामुळे कंपनीने या कर्मचाºयांना जाहीर निमंत्रण दिले आहे. जेटचे कर्मचारी घेणारी ताज ही आतिथ्य उद्योगातील पहिली संस्था असली तरी एअर इंडियासह हवाई क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी जेटच्या कर्मचाºयांना यापूर्वीच सामावून घेतले आहे. स्पाईस जेटने १ हजार कर्मचाºयांना घेतले आहे. टाटा समूहाची भागीदारीतील एअरलाइन्स ‘विस्तारा’नेही जेटच्या कर्मचाºयांना सामावून घेण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :जेट एअरवेजटाटाकर्मचारी