Join us

'व्हॉट अॅन आयकिया'; 200 रुपयांच्या शेकडो वस्तूंनी सजवा आपलं घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:13 IST

आयकिया कंपनीच्या पहिल्या स्टोरचा आज भारतात शुभारंभ होत आहे. हैदराममध्ये या 13 एकर स्टोअरचे ओपनिंग करण्यात येत आहे.

हैदराबाद - आयकिया कंपनीच्या पहिल्या रिटेल स्टोरचा आज भारतात शुभारंभ होत आहे. या 13 एकर स्टोअरचे हैदराबादमध्ये ओपनिंग होत आहे. या स्टोअरमधून ग्राहकाला 1 हजारांपेक्षा अधिक सामानांची खरेदी करता येणार असून त्याची किंमतही कमी असणार आहे. तर काही वस्तू तुम्हाला 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहेत. या मल्टीनॅशनल कंपनीच्या स्टोअरमध्ये फर्निचरपासून ते घरातील लहान-सहान वस्तूही तुम्हाला खरेदी करता येतील.

भारतातमध्ये सर्वांना परवडणारे सामान देण्यावर आमचा भर असेल, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे कंपनीच्या 7500 उत्पादित वस्तूंपैकी 1 हजारपेक्षा अधिक सामान केवळ 200 रुपयांत मिळणार आहेत. तसेच या स्टोअरमध्ये आयकियाने 1000 सीट्सची संख्या असलेले रेस्टॉरंटही उघडले आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवणासह, विदेशी मेजवानीचीही चव घेता येईल. येथे फक्त 149 रुपयांत तुम्हाला स्वीडनच्या फेमस मीटबॉल्सची मजा घेता येईल. तर बिर्याणी केवळ 99 रुपयांत मिळणार आहे. भारतात एक वर्षापेक्षा कमी कालावधीत 60 लाख ग्राहक जोडण्यात कंपनीला यश येईल, असे आयकिया रिटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटी बेत्जेल यांनी म्हटले आहे. तसेच या स्टोअरमध्ये 950 कर्मचारी असणार असून त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिला असणार आहेत. तर 2019 च्या उन्हाळ्यापूर्वी मुंबईतही आयकिया कंपनीचे स्टोअर सुरू होईल, असे बेत्जेल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :भारतव्यवसाय