Ivalue Infosolutions IPO: या आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. हा आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशनचा आयपीओ (Ivalue Infosolutions IPO) आहे. या कंपनीचा आयपीओ १८ सप्टेंबर रोजी उघडणार आहे. कंपनीनं काल म्हणजेच सोमवारी याचा प्राईज बँड जाहीर केला होता. हा एक मेनबोर्ड आयपीओ आहे. अशा परिस्थितीत, त्याची बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्टिंग प्रस्तावित आहे.
प्राईज बँड काय?
आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशनच्या आयपीओचा प्राईज बँड २८४ ते २९९ रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं ५० शेअर्सचा लॉट तयार केलाय. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९५० रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार २२ सप्टेंबरपर्यंत कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतात.
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
आयपीओची साईज काय?
आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशनच्या आयपीओचा आकार ५६०.२९ कोटी रुपये आहे. कंपनीचा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. म्हणजेच, विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे भागभांडवल कमी करणार आहेत. सुनील कुमार पिल्लई ७६२११५ शेअर्स, कृष्णा राज शर्मा १,१६४,६४५ शेअर्स आणि श्रीनिवासन श्रीराम ९२१०४८ शेअर्स विकत आहेत. ते कंपनीचे प्रवर्तक देखील आहेत. याशिवाय, अनेक विद्यमान गुंतवणूकदार आयपीओद्वारे त्यांचे शेअर्स विकणार आहेत.
आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काय करते कंपनी?
आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशन्स लिमिटेड टेक्नॉलॉजी सेवा आणि सोल्युशन्स सेवा प्रदान करते. कंपनीचा व्यवसाय भारतासह सार्क क्षेत्रांमध्ये आणि दक्षिण आशियामध्ये पसरलेला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)