Join us

आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 06:37 IST

जून २०२३ला संपलेल्या १२ महिन्यांत वेतन खर्चात १४.२ टक्के, तर महसुलात १२.४ टक्के वाढ झाली होती.

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२५ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कमी वेतनवाढीचे संकेत आहेत. आघाडीच्या ५ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची सरासरी वेतनवाढ ५ ते ८.५ टक्के राहील, असे जाणकारांनी सांगितले आहे.

‘टीमलीज डिजिटल’चे सीईओ नीति शर्मा म्हणाल्या की, आयटीत यंदा ७ ते ८ टक्के वेतनवाढ मिळू शकेल. उत्तम कामगिरी कर्मचाऱ्यांना १२ ते १८ टक्के वाढही मिळू शकते. ‘एक्सफेनो’चे संस्थापक तथा सीईओ कमल कारंथ यांनी सांगितले की, जून २०२३ला संपलेल्या १२ महिन्यांत वेतन खर्चात १४.२ टक्के, तर महसुलात १२.४ टक्के वाढ झाली होती.

दोन अंकी वेतनवाढ कोणत्या कर्मचाऱ्यांना?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) ४.५ ते ७ टक्के या दरम्यान वेतन वाढीची घोषणा केली आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने २ अंकी वेतनवाढ दिली आहे. इन्फोसिस, एचसीएलटेक आणि विप्रो यांच्यासह अन्य कंपन्यांनी अद्याप वेतनवाढीची घोषणा केलेली नाही.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञाननोकरी