Join us

टॅरिफमुळे तुमच्या नोकरीला धोका? टेन्शन नको, हे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:31 IST

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफमुळे सीफूड, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने या कामगाराधारित क्षेत्रांवर थेट परिणाम होणार आहे. निर्यात कमी झाल्यामुळे अनेक क्षेत्रात नोकऱ्या जाण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हे संकट म्हणजे शेवट नाही; याच संकटात नवीन मार्ग सापडतात.

स्थानिक बाजारपेठेत संधी : भारतीय ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली आहे. सीफूड असो वा कपडे-दागिने, यांची मागणी देशांतर्गत बाजारात प्रचंड आहे. निर्यातीवरच अवलंबून राहण्याऐवजी स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. छोटे उद्योग, सहकारी संस्था आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्पादने थेट विकण्याची संधी निर्माण झाली आहे.

पर्यायी निर्यात बाजार : अमेरिका मोठी बाजारपेठ आहे, पण एकमेव नाही. युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व व आग्नेय आशिया या प्रदेशांत भारतीय वस्तूंना मागणी आहे. उद्योजकांनी तिथे लक्ष केंद्रित केले तर रोजगार टिकवता येईल.कौशल्यविकास व पुनर्प्रशिक्षण : ज्या कामगारांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा.  कौशल्ये आत्मसात केले तर तुम्हाला नक्की नवीन रोजगार संधी निर्माण होईल.स्वयंपूर्णतेकडे वाटचाल : सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ घेऊन कामगारांनी स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याचा विचार करावा. अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली तरी, योग्य कौशल्य व बाजारपेठ मिळाल्यास रोजगार टिकवून ठेवणे शक्य आहे. 

टॅग्स :नोकरीकर्मचारी