Join us
Daily Top 2Weekly Top 5

'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:08 IST

Bata Footware Brand: भारताच्या बाजारपेठेत अनेक फूटवेअर ब्रँड्स उपलब्ध आहेत. यापैकी काही ब्रँड्स भारतीय आहेत, तर काही विदेशी आहेत. या लोकप्रिय फूटवेअर ब्रँड्सपैकी एक ब्रँड आहे बाटा.

Bata Footware Brand: भारताच्या बाजारपेठेत अनेक फूटवेअर ब्रँड्स उपलब्ध आहेत. यापैकी काही ब्रँड्स भारतीय आहेत, तर काही विदेशी आहेत. या लोकप्रिय फूटवेअर ब्रँड्सपैकी एक ब्रँड आहे बाटा (Bata). बहुतेक लोक बाटाला भारतीय ब्रँड समजतात, पण बाटा फूटवेअर ब्रँड भारतीय नाही. हा एक विदेशी ब्रँड आहे.

बाटा फूटवेअर ब्रँड विदेशी आहे का?

बाटा फूटवेअर ब्रँड भारतातील अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे. बाटा ब्रँडकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फूटवेअरचे मोठे कलेक्शन आहे, परंतु बाटा हा भारतीय ब्रँड नाही. बाटा फूटवेअर कंपनी युरोपची आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या फूटवेअर ब्रँडचे शूज घालतात, पण त्यांना अनेकदा तो ब्रँड भारतीय आहे की विदेशी हे माहीत नसतं. लोक अनेकदा शूजवर 'मेड इन इंडिया' (Made in India) लिहिलेले पाहून तो ब्रँड भारतीय आहे असं मानतात, पण तसं नसतं. त्यामुळेच, आज आम्ही तुम्हाला बाजारात कोणते फूटवेअर ब्रँड्स भारतीय आहेत आणि कोणते विदेशी आहेत याबद्दल माहिती देत आहोत.

मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?

भारतीय फूटवेअर ब्रँड्स कोणते?

भारतीय फूटवेअर ब्रँड्समध्ये रिलॅक्सो (Relaxo), पॅरागॉन (Paragon), लिबर्टी (Liberty), वुडलँड (Woodland), कॅम्पस (Campus), खादिम्स (Khadim's), स्पार्क्स (Sparx) आणि रेड चीफ (Red Chief) यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.

विदेशी फूटवेअर ब्रँड्स कोणते?

विदेशी ब्रँड्समध्ये Nike, ॲडिडास (Adidas), प्युमा (Puma), स्केचर्स (Skechers), क्रॉक्स (Crocs) यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.

Nike फूटवेअर ब्रँड अमेरिकेचा आहे.

ॲडिडास फूटवेअर ब्रँड जर्मनीचा आहे.

याशिवाय प्युमा फूटवेअर ब्रँडदेखील जर्मनीचा आहे.

इतर विदेशी फूटवेअर ब्रँड्समध्ये मिझूनो (Mizuno), फिला (Fila), व्हॅन्स (Vans), क्रॉक्स (Crocs) आणि क्लार्क्स (Clarks) यांसारख्या फूटवेअर ब्रँड्सचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bata: Foreign or Indian? Know your footwear brands origin.

Web Summary : Many believe Bata is Indian, but it's European. Relaxo, Paragon are Indian. Nike, Adidas are foreign. Knowing brand origin matters.
टॅग्स :व्यवसायभारत