Join us

IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:57 IST

IRCTC Black Friday Offer : ही ऑफर IRCTC फक्त एका दिवसासाठी देत ​​आहे. जर तुम्ही या दिवशी तिकीट बुक केले तर तुम्ही तुमचा प्रवास स्वस्तात प्लॅन करू शकता.

IRCTC Black Friday Offer : नवी दिल्ली : तुम्हीही अनेकदा आयआरसीटीसीद्वारे (IRCTC) ट्रेन किंवा विमानाचे तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. IRCTC या रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या उपकंपनीने 'बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर' आणली आहे. या ऑफर अंतर्गत, 29 नोव्हेंबर 2024 रोजी आयआरसीटीसी एअर (IRCTC Air) वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे फ्लाइट बुक करणाऱ्या ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सुविधा शुल्कावर (Convenience Fee) 100 टक्के सूट मिळणार आहे.

ही ऑफर IRCTC फक्त एका दिवसासाठी देत ​​आहे. जर तुम्ही या दिवशी तिकीट बुक केले तर तुम्ही तुमचा प्रवास स्वस्तात प्लॅन करू शकता. ब्लॅक फ्रायडे हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा शॉपिंग उत्सव आहे. या निमित्ताने प्रवाशांना आपली सुट्टी आनंदात घालवता येतील. IRCTC च्या ऑफरसह, तुम्ही आता तुमच्या उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुट्ट्यांचे प्लॅनिंग सुद्धा करू शकता. यामुळे तुम्ही तुमची फ्लाइट कमी किमतीत बुक करू शकता.

IRCTC ने दिलेल्या 'बिग ब्लॅक फ्रायडे ऑफर' अंतर्गत तुम्हाला कमी किमतीत तिकीट बुक करण्याची सुवर्णसंधी आहे. ही ऑफर फक्त एका दिवसासाठी म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वैध आहे. बुकिंग आयआरसीटीसी एअर वेबसाइट https://www.air.irctc.co.in किंवा आयआरसीटीसी एअर मोबाइल ॲपद्वारे केले जाऊ शकते. या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या सर्व फ्लाइटसोबत 50 लाख रुपयांचा मोफत प्रवास विमा देखील दिला जाणर आहे.

कोणत्या रुटवर मिळेल फायदा?IRCTC च्या ऑफर अंतर्गत, तुम्ही सुविधा शुल्कावर (Convenience Fee) 100 टक्के सूट घेऊन कोणत्याही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी तिकीट बुक करू शकता. 29 नोव्हेंबरसाठी वैध असलेल्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला www.air.irctc.co.in किंवा IRCTC एअर मोबाइल ॲपला भेट द्यावी लागेल. IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर बचतीची हमी देते. 

टॅग्स :आयआरसीटीसीविमानव्यवसाय