Join us

पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:35 IST

IRCTC Dividend : भारतीय रेल्वेची पर्यटन आणि कॅटरिंग कंपनी आयआरसीटीसीने गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने लाभांश वाटप जाहिर केलं आहे.

IRCTC Dividend : शेअर मार्केटमधील सध्याची परिस्थिती गुंतवणूकदारांसाठी फारशी चांगली नाही. दिग्गज कंपन्यांच्या स्टॉक्सने सपाटून मार खाल्ला आहे. अशा परिस्थितीत एक सरकारी कंपनी गुंतवणूकदारांना दिलासा देणार आहे. आपण भारतीय रेल्वेची पर्यटन आणि कॅटरिंग कंपनी आयआरसीटीसी (IRCTC) विषयी बोलत आहोत. कंपनीने मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने शेअर बाजार एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांच्या निव्वळ नफ्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३४१.०८ कोटी रुपयांचा आहे. याचा लाभांश आता गुंतवणूकदारांनीही देण्यात येणार आहे.

तिसऱ्या तिमाहीत आयआरसीटीसीच्या उत्पन्नात मोठी वाढनिव्वळ नफ्याबरोबरच कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने १२८१.२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ११६१.०४ कोटी रुपये होते.

आयआरसीटीसी गुंतवणूकदारांना देणार लाभांशआर्थिक निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांशही जाहीर केला आहे. IRCTC च्या संचालक मंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २ रुपये दर्शनी मूल्यासह प्रत्येक शेअरवर ३ रुपये लाभांश मंजूर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने घोषित केलेला हा दुसरा अंतरिम लाभांश आहे. येत्या २० फेब्रुवारी २०२४ ला कंपनी याचा लांभाश भरणार आहे.

शेअर मार्केटच्या भूकंपात आयआरसीटीसीचेही नुकसान या आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी चांगली राहिली नाही. काल मंगळवारी तर शेअर बाजारात भूकंप आला. सेन्सेक्स तब्बल १००० अकांनी कोसळला. यामध्ये अनेक दिग्गज शेअर्सला धक्का बसला. यातून आयआरसीटीसीचा शेअरही सुटला नाही. मंगळवारी BSE वर कंपनीचा समभाग २२.२५ (२.८८%) टक्क्यांनी घसरून ७५१.२५ वर बंद झाला.

टॅग्स :आयआरसीटीसीभारतीय रेल्वेशेअर बाजारशेअर बाजार