Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, एका तासासाठी थांबवावं लागलं ट्रेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:52 IST

Pakistan Share Market Crash: पाकिस्तानच्या शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या शेअर बाजारातील ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे

Pakistan Share Market Crash: पाकिस्तानच्याशेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. 'ब्लूमबर्ग'च्या माहितीनुसार, सुरुवातीच्या व्यवहारात कराची स्टॉक एक्सचेंजचा KSE-30 इंडेक्स सुमारे १० टक्क्यांनी कोसळला. पाकिस्तानच्याशेअर बाजारातील ही एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. ही परिस्थिती पाहता बाजारातील व्यवहार एक तासासाठी थांबवण्यात आले. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर आज जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली.

व्यवहारादरम्यानची आकडेवारी

मागील सत्रात हा इंडेक्स १६८,०६२.१७ अंकांवर बंद झाला होता आणि आज सुरुवातीच्या व्यवहारात तो १५२,९१६.७७ अंकांपर्यंत खाली आला. भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता हा इंडेक्स १०,३७१.२४ अंक म्हणजेच ६.१७% च्या घसरणीसह १५७,६९०.९३ अंकांवर व्यवहार करत होता.

SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८५,०४९ चं फिक्स व्याज, पाहा कॅलक्युलेशन

मागील घसरणीचा संदर्भ

यापूर्वी शुक्रवारी देखील KSE-100 इंडेक्समध्ये सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली होती. अफगाणिस्तानसोबतच्या सीमेवरील चकमकींमुळे ही घसरण झाली होती. त्यावेळी इंडेक्स ३,०८१ अंक म्हणजेच १.८२ टक्क्यांच्या घसरणीसह १६५,८११.८८ पर्यंत खाली आला होता. मात्र, नंतर त्यात सुधारणा होऊन तो १६८,०६२.१७ अंकांवर बंद झाला होता.

भारतीय शेअर बाजारातही घसरण

अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. बाजार उघडताच सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स ९१४.१५ अंकांच्या जोरदार घसरणीसह ८०,३७३.०४ च्या पातळीवर आला. याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील २४६.४० अंकांच्या घसरणीसह २४,९३२.२५ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Stock Market Plummets, Trading Halted Amidst Historic Drop

Web Summary : Pakistan's stock market experienced a record crash, with the KSE-30 index plummeting roughly 10%, leading to a temporary trading halt. This significant downturn, the largest single-day drop ever, mirrored global market declines following reported attacks on Iran. Indian markets also saw volatility amidst Middle East tensions.
टॅग्स :पाकिस्तानशेअर बाजारगुंतवणूक