Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्धामुळे महागाईचा भडका उडणार! पेट्रोल १३५ रुपयांच्या पार? रुपया घसरणार आणि गृहकर्जही महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:33 IST

Iran Israel War India Economy Impact: इराण-इस्रायल युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट! कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल, महागाई आणि गृहकर्ज महागणार. रुपया ९६ प्रति डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता. वाचा सविस्तर विश्लेषण.

नवी दिल्ली/मुंबई: पश्चिम आशियातील युद्ध केवळ रणभूमीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचे पडसाद आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर उमटू लागले आहेत. इराण-अमेरिका-इस्रायल तणाव असाच कायम राहिल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊन भारतात महागाईचा मोठा स्फोट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

तुमच्या खिशावर होणारे ५ मोठे परिणाम:

१. पेट्रोल-डिझेलचा भडका: सध्या ब्रेंट क्रूड ७५ डॉलर प्रतिबॅरलच्या आसपास आहे. मात्र, युद्ध लांबल्यास हे दर १२० ते १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात. यामुळे सध्या ९५ ते १०५ रुपयांच्या दरम्यान असलेले पेट्रोल थेट १२० ते १३५ रुपये प्रतिलिटर होण्याची दाट शक्यता आहे.

२. रुपयाची ऐतिहासिक घसरण: कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येक १ डॉलरची वाढ भारताचे आयात बिल १२,००० ते १६,००० कोटी रुपयांनी वाढवते. यामुळे रुपया कमजोर होऊन प्रति डॉलर ९२ ते ९६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो.

३. महागाईचा दर ७.५ टक्क्यांवर? डिझेल महागल्याने मालवाहतुकीचा खर्च १०-१५ टक्क्यांनी वाढेल. याचा थेट परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाईचा दर ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

४. गृहकर्जाचे हप्ते वाढणार: वाढत्या महागाईला रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) व्याजदर वाढवू शकते. यामुळे नवीन आणि जुन्या गृहकर्जाचे (Home Loan) तसेच वाहनकर्जाचे हप्ते (EMI) महाग होण्याची भीती आहे.

५. जागतिक जीडीपीला फटका: समुद्री मार्गाने होणाऱ्या तेल व्यापारात इराणच्या क्षेत्राचा ३०% वाटा आहे. युद्धामुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास जागतिक विकासदरात (GDP) १.५% पेक्षा जास्त घट होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran-Israel War: Inflation Surge, Fuel Prices, Rupee Depreciation, Costlier Loans!

Web Summary : Iran-Israel conflict threatens India's economy, spiking fuel prices to ₹135/liter. Rupee may plummet to 96/dollar, inflation could hit 7.5%, and home loans are likely to become more expensive. Global GDP faces a potential 1.5% hit.
टॅग्स :इराणइस्रायलखनिज तेलमहागाई