Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल डिझेल बाबत काय म्हटलंय पेट्रोलियम कंपन्यांनी? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 10:51 IST

Iran Israel America War Crude Oil: इराणचं अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधन संकट निर्माण होणार असल्याच्या अफवेनं सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Iran Israel America War Crude Oil: इराणचं अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधन संकट निर्माण होणार असल्याच्या अफवेनं सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. देशाच्या विविध भागात लोक पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईलनं (IOC) स्पष्टीकरण जारी केलंय. बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) या कंपन्यांनीही अशाच प्रकारचे आश्वासन दिलं आहे.

इंडियन ऑईलनं नेमकं काय म्हटलं?इंडियन ऑईलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीये. "पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण नेटवर्क सुरळीतपणे सुरू आहे. इंडियन ऑईल अखंडित इंधन पुरवठा राखण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही," असं त्यांनी नमूद केलंय.

खिशात फक्त ४ रुपये घेऊन आलेले मुंबईत; आज अंबानी, तेंडुलकर, बॉलिवूड सेलिब्रिटी येताहेत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये

कंपनीने लोकांना आवाहन केलंय की, पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करू नका आणि केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनंही (HPCL), काही भागांतील इंधन टंचाईचे संदेश दिशाभूल करणारे असून संपूर्ण भारतात पुरवठा सामान्य असल्याचं म्हटलंय.

एलपीजी उत्पादनाबाबत सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये

दरम्यान, सरकारनं तेल रिफायनरींना एलपीजी (LPG) उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यासाठी 'एस्मा' (ESMA) कायद्यांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात सर्व सार्वजनिक आणि खासगी रिफायनरींना सांगितलंय की, उत्पादनादरम्यान निघणाऱ्या प्रोपेन आणि ब्युटेन वायूचा जास्तीत जास्त वापर एलपीजी उत्पादनासाठी करावा.

रिफायनरींना नवीन नियम आणि निर्बंध

अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ (एस्मा) अंतर्गत जारी केलेल्या या आदेशात रिफायनरींना त्यांचे उत्पादित एलपीजी केवळ तीन सार्वजनिक तेल कंपन्यांना, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांना पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सरकारने रिफायनरींना प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर पेट्रोकेमिकल उत्पादनं बनवण्यासाठी करण्यास मज्जाव केला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, या वायूंचा वापर कोणत्याही पेट्रोकेमिकल निर्मितीसाठी, प्रक्रियेसाठी किंवा रूपांतरणासाठी केला जाणार नाही. एलपीजी हे प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचे मिश्रण असून भारतात याचा वापर घरगुती स्वयंपाकाचा गॅस म्हणून केला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Petroleum Companies Address Fuel Concerns Amidst Iran-Israel Tensions: Details Here

Web Summary : Oil companies assure adequate fuel supply despite war-related panic buying. IOC, BPCL, and HPCL dismiss shortage rumors. The government directs refineries to maximize LPG production, ensuring sufficient cooking gas availability, restricting petrochemical use of propane and butane.
टॅग्स :पेट्रोलडिझेलपेट्रोल पंपइराणइस्रायल