Join us
Daily Top 2Weekly Top 5

Iran Israel War Crude Oil Price: ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं! कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; ८ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:23 IST

Iran Israel War Crude Oil Price: ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती, तसंच झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली.

Iran Israel War Crude Oil Price: ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती, तसंच झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. अमेरिकन क्रूड बेंचमार्क 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड' (WTI) फ्यूचर्स १० टक्क्यांनी वधारून ७५ डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहोचलं, जे गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. 'tradingeconomics' नुसार, नंतर यामध्ये थोडी घसरण झाली असली तरी, किमती अजूनही ८ टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होत्या. अमेरिका आणि इस्रायलनंइराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर ही तेजी आली असून, यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे.

'स्ट्रेट ऑफ होर्मुज'कडे जगाचं लक्ष

दरम्यान, बाजाराचं लक्ष प्रामुख्यानं 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर लागलं आहे, जो जागतिक कच्च्या तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा सांभाळणारा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. तेहराननं हा जलमार्ग खुला असल्याचा दावा केला, परंतु शिपिंग कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जहाजांना या मार्गावरून हटवून पर्यायी मार्गावर वळवण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, इराणनं अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य करत संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक आणि सीरियासह शेजारील देशांवर हल्ले केले.

या दरम्यान, तेल उत्पादक गट 'OPEC+' नं रविवारी एप्रिलमध्ये दररोज २,०६,००० बॅरल उत्पादन वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे, जे जागतिक मागणीच्या ०.२ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Barclays कडून १०० डॉलर प्रति बॅरलचा अंदाज

जागतिक तेल बाजारातील वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान ब्रिटनमधील प्रमुख बँक 'Barclays' नं ब्रेंट क्रूडचा आपला अंदाज वाढवून १०० डॉलर प्रति बॅरल केलाय. बँकेने इशारा दिलाय की, बाजारपेठेला पुरवठ्यातील गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बार्कलेजने म्हटलंय की, "सोमवारी तेल बाजाराला आपल्या सर्वात मोठ्या भीतीचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच जर मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिक बिघडली, तर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी मोठी वाढ होऊ शकते." तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत पुरवठा साखळीत कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Crude oil prices surge to 8-month high amid Iran-Israel tension

Web Summary : Iran-Israel tensions spiked crude oil prices to an 8-month high. WTI futures jumped 10%. Concerns rise over Strait of Hormuz disruptions. Barclays forecasts $100 per barrel amid supply worries. OPEC+ output increase is minimal.
टॅग्स :खनिज तेलइराणइस्रायल