Iran Crude Oil Production: अमेरिकेने लादलेल्या कडक निर्बंधांमुळे इराणच्या तेल निर्यातीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे देशाला कच्च्या तेलाच्या साठवणुकीची गंभीर समस्या भेडसावत आहे. इराणचे प्रमुख निर्यात केंद्र असलेले खार्ग बेट साठवण क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचत आहे. या वाढत्या दबावाचा सामना करण्यासाठी इराणने आता थेट समुद्रात ‘फ्लोटिंग स्टोरेज’चा पर्याय स्वीकारला असून, सुमारे ३० वर्षे जुने MT Nasha हे क्रूड कॅरियर पुन्हा सक्रिय करण्याची तयारी सुरू केली आहे.
साठवण क्षमतेवर ताण
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन निर्बंधांमुळे निर्यात कमी झाली असली तरी खर्ग बेटावर कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच आहे. येथे दररोज सुमारे १० ते ११ लाख बॅरल तेलाचा उपसा सुरू आहे. सध्या जमिनीवरील साठवण क्षमता अंदाजे १.३ कोटी बॅरल शिल्लक असून, या वेगाने साठवण क्षमता २ आठवड्यांत पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
‘फ्लोटिंग स्टोरेज’चा पर्याय
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इराणने समुद्रात तेल साठवण्यासाठी टँकर्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षे जुने MT Nasha पुन्हा सेवेत दाखल केले असून, यात तेल साठवण्याची तयारी सुरू केली आहे. ही पद्धत तात्पुरता दिलासा देऊ शकते, पण दीर्घकालीन उपाय नाही. तज्ज्ञांच्या मते, ‘फ्लोटिंग स्टोरेज’ हा केवळ तात्पुरता आणि खर्चिक उपाय आहे. जर साठवण क्षमता पूर्ण भरली, तर इराणला तेल उत्पादन थांबवावे लागू शकते. यामुळे तेल विहिरींना दीर्घकालीन नुकसान होऊन भविष्यातील उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
खर्ग बेटाचे महत्त्व
इराणच्या तेल अर्थव्यवस्थेत खार्ग बेटाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. देशाच्या सुमारे ९०% कच्च्या तेलाची निर्यात याच ठिकाणावरून होते. पर्शियन गल्फमध्ये खोल पाण्यामुळे मोठे सुपरटँकर्स सहज लंगर टाकू शकतात. तसेच, अबूजर, फोरूजन आणि दोरूद या ऑफशोअर क्षेत्रांतील तेलाची येथेच प्रक्रिया होते. या ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ती थेट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते. यावरूनच तुम्ही या बेटाचे महत्व जाणू शकता.
Web Summary : Iran faces oil storage crisis due to US sanctions. Kharg Island is nearing capacity, pushing Iran to use floating storage in the sea with older tankers. Production may halt if storage overflows, damaging oil wells.
Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के कारण ईरान तेल भंडारण संकट का सामना कर रहा है। खर्ग द्वीप क्षमता के करीब है, जिससे ईरान पुराने टैंकरों के साथ समुद्र में तैरता हुआ भंडारण का उपयोग करने के लिए मजबूर है। भंडारण फुल होने पर उत्पादन रुक सकता है, जिससे तेल कुओं को नुकसान होगा।