Join us

अंबानी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती; RIL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कोण आहेत इरा बिंदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:19 IST

Who is Ira Binda: मुकेश अंबानी यांनी इरा ब‍िंदा यांची र‍िलायन्स इंडस्‍ट्रीजमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

Reliance Industries Ltd: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी इरा बिंदा यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये नवीन समूह अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. इरा यांच्या नियुक्तीबाबत मुकेश अंबानी यांनी सांगितले की, इराकडे कार्यकारी समिती, ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या मदतीने कंपनीचा लोककेंद्रित उपक्रम चालवण्याची जबाबदारी असेल.  

कोण आहे इरा बिंदा?मुकेश अंबानी यांनी स्वतः इरा बिंदा यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या धोरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी, बिंदा यांनी मेडट्रॉनिक, यूएसए येथे मानव संसाधन प्रमुख आणि उपाध्यक्ष, ग्लोबल रीजन म्हणून काम केले आहे. बिंदांकडे प्रचंड व्यावसायिक अनुभव आहे. त्यांनी जीई कॅपिटल, जीई इंडिया, जीई हेल्थकेअर आणि जीई ऑइल अँड गॅस सारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. 

रिलायन्समध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलालिंक्डइन पोस्टमध्ये बिंदांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, त्या अध्यक्ष मुकेश अंबानी आणि संचालक, ईशा अंबानी पिरामल, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासह कंपनीमध्ये बदल घडवून आणण्यास उत्सुक आहेत. त्यांनी आपल्या मित्रांचे आणि प्रायोजकांचे आभार मानले. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स