IPL 2025 suspension : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. मात्र, युद्धविराम घोषित केल्यानंतर ३ तासातच पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धा होणार का? यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. असे झाल्यास बीसीसीआयला सर्वात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. कारण, फक्त एक आठवड्याचा ब्रेक बीसीसीआयचे बरेच मोठे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयला किती नुकसान होऊ शकते?प्रत्येक आयपीएल सामना टीव्ही डील, तिकिट विक्री, प्रायोजक आणि फूड स्टॉल्समधून पैसे कमविण्यास मदत करतो. रिपोर्ट्सनुसार, रद्द झालेल्या प्रत्येक सामन्यामुळे बीसीसीआयला सुमारे १००-१२५ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. विमा मिळाल्यानंतरही, बीसीसीआयला प्रत्येक सामन्यात सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर या एका आठवड्याच्या ब्रेकमध्ये ५ ते ७ सामने रद्द झाले तर बीसीसीआयला ३००-४२० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. जर ब्रेक वाढवला गेला किंवा संपूर्ण सत्र रद्द केले गेले तर नुकसान आणखी मोठे होऊ शकते.
प्रायोजक आणि प्रसारकांवर परिणामटाटा सारखे मोठे प्रायोजक आणि जिओहॉटस्टार सारखे ब्रॉडकास्टर्स सध्याच्या ब्रेकवर खूश आहेत. पण, हे जास्त काळ वाढलं तर मात्र त्यांची चिता वाढू शकते. प्रसारक त्याच्या जाहिरातींच्या पैशाचा काही भाग गमावू शकतो. जो अंदाजे ५,५०० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.
याचा संघांवर काय परिणाम होईल?आयपीएलच्या १० संघांचेही यात मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांना बीसीसीआयच्या टीव्ही आणि प्रायोजकांच्या पैशातून काही हिस्सा मिळतो, ज्याला सेंट्रल रेव्हेन्यू पूल म्हणतात. जर आयपीएल रद्द झाले तर नफाही कमी होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या मोठा चाहता वर्ग असलेल्या संघाचे घरच्या मैदानावरील २ सामने बाकी आहेत. या सामान्यांचे तिकीटांची आधीच विक्री झाली आहे.
वाचा - फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
जर स्पर्धा रद्द झाली तर?जर आयपीएल २०२५ पूर्णपणे रद्द झाले तर बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. प्रसारकांनाही त्यांच्या जाहिरातींच्या पैशाचा एक तृतीयांश भाग गमवावा लागू शकतो आणि सेंट्रल पूलवर अवलंबून असलेल्या संघांनाही तोटा होईल.