Join us  

जोर का झटका 'जिओ' से, इंटरनेट स्पीड 90 टक्क्यांनी घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 11:33 AM

जिओ फायबरसाठी देण्यात येणाऱ्या इंटरनेट स्पीडला आता कॅपिंग लावण्यात आले आहे

मुंबई - टेलिफोन सेक्टरप्रमाणेच ब्रॉडबँण्ड क्षेत्रातही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रातही सातत्याने मोठा बदल होत असल्याचे दिसून येते. रिलायन्स जिओ फायबरने या बदलाची सुरुवात केली आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार काही युजर्संने ट्विटरवरुन जिओ फायबरबद्दल तक्रार दिली आहे. जिओ फायबरसोबत मिळणाऱ्या इंटरनेटचा स्पीड अतिशय कमी झाल्याचं या युजर्संने ट्विटरवरुन सांगितले आहे.

जिओ फायबरसाठी देण्यात येणाऱ्या इंटरनेट स्पीडला आता कॅपिंग लावण्यात आले आहे. जिओ फायबरसाठी अपलोड इंटरनेट स्पीड निश्चित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच कनेक्शनसोबत देण्यात येणारा अपलोड स्पीड कमी होता. मात्र, आता आणखी स्पीड कमी झाल्याचं युजर्संने म्हटले आहे. ट्विटर युजर्संच्या म्हणण्यानुसार, जिओ फायबरच्या कनेक्शनसोबत पुरविण्यात येणारा अपलोड स्पीड ओरीजनल स्पीडच्या तुलनेत केवळ 10 टक्केच असल्याचं दिसून येतंय. सर्वसाधारण भाषेत समजून घ्यायचं झाल्यास, 100 MBPS असलेला स्पीड युजर्संना आता केवळ 10 MBPS एवढाच गतीने मिळत आहे.

कुठलिही इंटरनेट प्रोव्हायडर कंपनी युजर्संना इंटरनेट कनेक्शन देते, त्यावेळी डाऊनलोड आणि अपलोड स्पीड समान असतो. त्यातच, जर एखाद्या युजरने 100 MBPS चा डेटा प्लॅन घेतला. तर त्यास, डाऊनलोड आणि अपलोड स्पीडही 100 MBPS एवढाच असतो. मात्र, युजर्संच्या तक्रारीवरुन सध्या या दोन्ही स्पीडमध्ये मोठी तफावत जाणवत आहे. जिओ फायबरच्या 1 Gbps प्लॅनची खरेदी करणाऱ्या युजर्संना 100 MBPS स्पीड मिळत आहे. पण, घरगुती कनेक्शन घेणाऱ्या युजर्संना, ऑनलाईन गेम्स खेळताना कमी स्पीडचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :जिओइंटरनेटऑनलाइन