नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल सरकारचा अंतरिम बजेट सादर करत आहेत. आयुष्यमान योजनेचा अनेक गोरगरिबांना रुग्णांना फायदा झाल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं आहे. आयुष्यमान योजनेंतर्गत आतापर्यंत 10 लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे तीन हजार कोटी रुपये मध्यम आणि गरिबांचे वाचल्याचा उल्लेखही पीयूष गोयल यांनी केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून औषधांच्या किमती कमी झाल्यानं त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ मिळाला आहे. पंतप्रधान औषध दुकानातून रुग्णांना स्वस्त औषधं उपलब्ध करून दिली जात आहे. मोदी सरकारनं स्वास्थ्य क्षेत्रात अभूतपूर्व विकास केला आहे. आम्ही देशातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना आयुष्यमान भारत गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्याद्वारे 50 कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था केली.
Budget 2019 : "जगातल्या सर्वात मोठ्या आयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे तीन हजार कोटी वाचले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 11:38 IST