Join us

प्रोत्साहन पॅकेज उभारी देण्यास अपुरे - अभिजित बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:35 IST

अभिजित बॅनर्जी : सप्टेंबरअखेर वाढ दिसण्याची शक्यता

नवी दिल्ली : कोविड-१९चा जगात सर्वाधिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांत भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश असून, सरकारने घोषित केलेले पॅकेज भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या सोडविण्यासाठी पुरेसे नाही, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केले आहे. तथापि, चालू वित्त वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत वृद्धीत सुधारणा दिसून येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

एका आॅनलाइन कार्यक्रमात सहभागी होताना बॅनर्जी यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारी येण्याच्या आधीच देशाची आर्थिक वृद्धी मंदावली होती. त्यातच अर्थव्यवस्थेला कोविड-१९चा फटका बसला. कोविड-१९मुळे सर्वाधिक सुमार कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांत भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होतो. चालू तिमाहीत अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होऊ शकते. २०२१ची आर्थिक वृद्धी यंदाच्या तुलनेत चांगली राहील.अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये (एमआयटी) प्राध्यापक असलेल्या बॅनर्जी यांनी सांगितले की, भारताचे प्रोत्साहन पॅकेज पुरेसे आहे, असे मला वाटत नाही. भारताचे प्रोत्साहन मर्यादित आहे. हे बँक बेलआउट आहे. मला असे वाटते की, आपण आणखी अधिक करू शकलो असतो. प्रोत्साहन उपाययोजनांनी कमी उत्पन्न असलेल्या गटातील लोकांच्या उपभोग खर्चात कोणतीही वाढ झालेलीनाही.अधिक स्पर्धात्मक होण्याची गरजमहागाईबाबत बॅनर्जी यांनी सांगितले की, भारताची वृद्धी रणनीती ‘बंद अर्थव्यवस्थे’ची आहे. सरकार स्वत:च भरपूर मागणी निर्माण करते. त्यातून उच्च वृद्धीबरोबर महागाईचीही निर्मिती होते. मागील २0 वर्षांपासून भारत उच्च वृद्धीबरोबर उच्च महागाई अनुभवत आहे. मागील २0 वर्षांतील स्थिर महागाईचा लाभ देशाला मिळाला आहे. भारताने जागतिक पातळीवर अधिक स्पर्धात्मक होण्याची गरज आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉक