Join us

दिलासा! आता जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; सीएमआयईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:32 IST

‘सीएमआयई’ने म्हटले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारातील कांद्याचा  भाव ४,६५४ रुपये प्रति क्विंटल होता.

 नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तूंचे भाव लवकरच कमी होतील तसेच कांद्याचा भाव डिसंबरअखेरपर्यंत घसरून प्रति क्लिंटल ३,७५० रुपये होईल, असा दावा ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) केला आहे.

‘सीएमआयई’ने म्हटले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारातील कांद्याचा  भाव ४,६५४ रुपये प्रति क्विंटल होता. १६ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात तो वाढून ५,१३१ रुपये प्रति क्विंटल झाला. जूनआधी तो २ हजार रुपये प्रति क्विंटल होता. आता कांद्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे. या महिन्यात कांद्याची आवक वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये कांद्याची आवक नेहमीपेक्षा २३.८ टक्के कमी होती. १ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत कांद्याची आवक एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २३.२ टक्के जास्त होती.

डाळ, बटाटे, टोमॅटोही होणार स्वस्त

ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले की, बटाटे, टोमॅटोचे भावही कमी होतील.

किमती नियंत्रणासाठी अनेक उपाय केले. डाळींची आयात नि:शुल्क केली असून साठामर्यादाही लागू केल्याने किमती कमी होण्यास मदत होईल. किमतींतील वाढ ही हंगामी स्वरूपाची असून पुरवठा घटल्यामुळे ती झाली आहे.

टॅग्स :महागाईभाज्या