Join us

उद्योगांना परवाने मिळणार एकाच छताखाली, पुण्यात होणार राज्यातील पहिले विभागीय सुविधा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:54 IST

Industries : महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल या अंतर्गत हे सुविधा केंद्र उद्योजकांच्या सेवेत येत आहे. महाराष्ट्र सरकारने उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ही मोहीम हाती घेतली आहे.

- विशाल शिर्के

पिंपरी : पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळासह आवश्यक अ‍ौद्योगिक परवाने मिळविणे कंपन्यांना सहज शक्य व्हावे यासाठी राज्यातील पहिले विभागीय सुविधा केंद्र होणार आहे. येत्या पंधरवड्यात उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील हे केंद्र पुण्यातील शिवाजीनगर येथे कार्यान्वित होत आहे.महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल या अंतर्गत हे सुविधा केंद्र उद्योजकांच्या सेवेत येत आहे. महाराष्ट्र सरकारने उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत नुकतेच ६१ हजार ४२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातील ४,२६१ कोटींची गुंतवणूक पुणे विभागात होणार आहे. त्यातून सर्वाधिक ९ प्रकल्प पुणे विभागात उभारण्यात येणार आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत तीन टप्प्यांमध्ये  विविध कंपन्यांशी परस्पर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. 

उद्योगांना जागा घेण्यासाठी मदत करणे, परवानग्या मिळवून देणे, ना हरकत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आणि इतर परवानग्या मिळवूून देण्यासाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले आहे. राज्यातील हे पहिले विभागीय केंद्र असेल. सुरुवातीस मोठ्या प्रकल्पांवर भर दिला जाईल. - सदाशिव सुरवसे, सहसंचालक उद्योग, पुणे विभाग

टॅग्स :व्यवसायमहाराष्ट्र