Join us

मुकेश अंबानी पुन्हा एकदा झाले आजोबा; मुलगी ईशाने जुळ्या मुलांना दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:47 IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

नवी दिल्ली : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. लक्षणीय बाब म्हणजे मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. 

२०१८ मध्ये झालं होतं ईशा आणि आनंद यांच लग्नईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये ईशाला रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले. खरं तर २०२० मध्येच मुकेश अंबानी आजोबा झाले, जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता हिने १० डिंसेबर रोजी मुलाला जन्म दिला. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुकेश अंबानीईशा अंबानीआकाश अंबानीनीता अंबानी