Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील नामवंत उद्योगपतीचे रक्षाबंधन, आनंदाने शेअर केले बालपणीचे क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 19:52 IST

नवी दिल्ली - देशभरात सकाळपासून रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या प्रेमाचा सण मोठ्या आनंदान साजरा होत आहे. आपल्या बहिणीकडून राखी बांधून ...

ठळक मुद्देभावा बहिणीमधील प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षा बंधनाचा सण आज संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या हातात प्रेमावे एक धागा बांधते.

नवी दिल्ली - देशभरात सकाळपासून रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या प्रेमाचा सण मोठ्या आनंदान साजरा होत आहे. आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेत तिच्या रक्षणाची जबाबदारी, वचन भावाकडून दिले जात आहे. सोशल मीडियावरही सेलिब्रिटीं, नेतेमंडळींनी रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी बालपणीच्या आठवणीही जागवल्या आहेत. उद्योगपती आनंद महिंद्र यांनीही आपल्या बालपणीचा फोटो शेअर करत राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. 

भावा बहिणीमधील प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षा बंधनाचा सण आज संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या हातात प्रेमावे एक धागा बांधते. यावेळी सुख-दु:खाच्या क्षणी साथ देण्याचे वचन दिले जाते. देशातील बॉलिवूड, क्रीडा आणि उद्योग जगतामध्येही भावा बहिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. राजकीय वर्तुळातही नेतेमंडळीही राखी बांधून हा उत्सव साजरा करतात. गाणगोकिळा लता मंगेशकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी पाठवली आहे. 

आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असलेले आणि एक ट्विट करुन कार गिफ्ट देणारे उद्योजक म्हणून आनंद महिंद्रा यांनी ओळखले जाते. आनंद महिंद्रांनी आज बहिणींसोबतचा फोटो शेअर केला आहे. रक्षाबंधन सणाची आठवण त्यांनी जागवली आहे. त्यामध्ये, लहानपणीचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. अस्थीर आणि अप्रत्यशीत जगात आपण नेहमीच स्थीरता शोधत असतो. माझ्या आयुष्यात कायम स्थीर, सोबत असलेल्या 'राखी'बद्दल माझ्या राधिका आणि अनुजा या बहिणींचे खूप खूप आभार... असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. महिंद्रा यांनी लहापणीचा फोटोही शेअर केला आहे.  

टॅग्स :रक्षाबंधनआनंद महिंद्राव्यवसायट्विटर