Join us
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo'ने दिला झटका! 'या' सीटसाठी प्रवाशांना २००० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:59 IST

इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर काही दिवसांनी इंडिगोने आपल्या काही सीटच्या भाड्यात वाढ जाहीर केली आहे.

काही दिवसापूर्वी विमान प्रवास स्वस्त होणार अशी माहिती समोर आली होती, विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे प्रवास स्वस्त होणार होते.या पार्श्वभूमीवरच देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला असून आपल्या काही निवडक आसनांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने ४ जानेवारीलाच भाडे कमी करण्याची घोषणा केली होती. कॉस्ट एअर फ्युएल फी मध्ये कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा काही जागांच्या भाड्यात वाढ जाहीर केली आहे. आता प्रवाशांना ठराविक सीटसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. 

EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

सोमवारी याची घोषणा करताना इंडिगोने माहिती दिली आहे. प्रवाशांना समोरच्या सीटसाठी अधिक भाडे द्यावे लागेल जिथे ते लेग्रूमसह XL सीट आहे. एअरलाइन्सच्या A320 किंवा A320neo विमानात 180 किंवा 186 सीट्सपैकी 18 अशा सीट्स आहेत ज्या समोरच्या XL सीट्स आहेत. आता या विंडो सीटसाठी प्रवाशांना कमाल २००० रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे. पुढच्या मधल्या सीटसाठी प्रवाशांना आता १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे. याआधी एअरलाइन्स कंपनी या जागांसाठी १५० ते १५०० रुपये जादा आकारत होती.

देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी इंडिगोने हवाई इंधनाच्या किमती कमी केल्यानंतर ४ जानेवारी रोजी इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या कपातीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या असून, त्याचा फायदा आता इंडिगो प्रवाशांना देत आहे. कंपनीच्या या घोषणेनंतर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंडिगोचे भाडे ३०० ते १००० रुपयांनी कमी झाले आहे. एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चात ATF चा वाटा ४० टक्क्यांपर्यंत असू शकतो.

टॅग्स :इंडिगोविमान