Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोमुळे प्रवाशांना झाला होता मनस्ताप; आता कंपनीच अडचणीत आली, मोठा तोटा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:58 IST

मागील महिन्यात इंडिगो विमान कंपनीच्या ग्राहकांना विमानतळावर तासन् तास रांगेत थांबावे लागले होते. चार -पाच दिवस देशभरात इंडिगोमुळे गोंधळ उडाला होता. यामुळे आता इंडिगो कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यांचा नफा ७८% ने घसरून फक्त ५५० कोटी रुपयांवर आला आहे.

मागील काही दिवसापूर्वी इंडिगोच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. अचानक उड्डाणे रद्द झाल्यामुळे ग्राहकांना चार-चार तास उशीर विमानतळावर थांबावे लागले होते, उड्डाण रद्द होणे आणि लांब रांगा लागणे हे प्रवाशांसाठी केवळ डोकेदुखीचे कारण नव्हते, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या तिजोरीवरही होत आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि हे आकडे मोठ्या आर्थिक अडचणीचे संकेत देत आहेत. कंपनी मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

Fadnavis in Davos: विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर, सांगितले दावोस दौऱ्याचे महत्त्व; म्हणाले, "ज्या प्रकारच्या..."

इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशनने जाहीर केलेले आकडे धक्कादायक आहेत. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने २,४४९ कोटी रुपयांचा मोठा नफा कमावला होता, पण यावेळी तो फक्त ५५० कोटींवर आला आहे. ही नफ्यात ७८% घट दर्शवते.

या तीन कारणांमुळे नुकसान झाले

कंपनीच्या मते, यामागे तीन प्रमुख कारणे होती. पहिले, नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कंपनीला अंदाजे ९६९ कोटींचे नुकसान झाले. दुसरे, डिसेंबरच्या सुरुवातीला ऑपरेशनल संकट आणि उड्डाण रद्द झाल्यामुळे ५७७ कोटींचे नुकसान झाले. आणि तिसरे, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चढउतारांचाही कंपनीवर मोठा भार पडला.

महसूल वाढला

नफा कमी झाला आहे, पण विमान कंपनीचा महसूल वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल ६ टक्क्यांनी वाढला आहे. जर कंपनीवर कामगार कायदे आणि कामकाजातील अडचणींचा भार पडला नसता, तर तिचा नफा प्रत्यक्षात ३,००० कोटींपेक्षा जास्त झाला असता.

असंख्य तक्रारी आणि रद्दीकरणे असूनही, या तिमाहीत इंडिगोच्या प्रवाशांची संख्या अंदाजे २.८ टक्क्यांनी वाढली. या काळात एकूण ३.१ कोटी लोकांनी इंडिगोने प्रवास केला. प्रति सीट उत्पन्नात थोडीशी घट झाली आहे.

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनीही डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या गोंधळावर भाष्य केले. ऑपरेशनल अडचणींमुळे मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाली, जी कंपनीसाठी एक मोठा धक्का होता.

एल्बर्स म्हणाले की, या आव्हानांना न जुमानता, कंपनीने २४५ अब्ज उत्पन्न मिळवले, जे इंडिगोचा बाजारातील वाटा मजबूत असल्याचे दर्शवते. कंपनी तिचे नेटवर्क वाढवत आहे आणि भविष्यात प्रवाशांना चांगला अनुभव आणि विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही त्यांनी सांगितले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Faces Losses After Passenger Frustration; Company in Trouble

Web Summary : Indigo's profits plummeted 78% due to operational issues, new labor laws, and rupee fluctuations. Despite increased revenue and passenger numbers, flight cancellations caused significant losses. The CEO aims for improved reliability.
टॅग्स :इंडिगोविमान