Indigo Airline: देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रवासी उड्डाणे करणारी इंडिगो एअरलाइन सध्या गंभीर संकटात सापडली आहे. हे संकट केवळ प्रवाशांपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतीय विमान वाहतूक क्षेत्राची कंबर मोडणारे ठरले आहे. मागील दोन दिवसांत इंडिगोला आपली 200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली, तर डझनभर फ्लाइट्स उशिराने उडाल्या.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या विमानतळांवर सकाळपासून फ्लाइट्सचे शेड्युल बिघडल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. यामुळे प्रवाशांमध्येही तीव्र नाराजी पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कंपनीवरील आपला राग व्यक्त केला. विशेष म्हणजे, कंपनीची ही समस्या फक्त दोन दिवसांची नाही. मागील 30 दिवसांपासून इंडिगोने 1400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळेच, भारताची सर्वात मोठ्या एअरलाइन्सची अशी अवस्था कशी झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
नेमकं काय झालंय?
संकट अचानक दिसत असले, तरी त्याची बीजे मागील महिन्यातच रोवली गेली होती. नोव्हेंबरमध्ये 1200 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द झाल्या, तर डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांतच 400 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या. याचे कारण म्हणजे, 1 नोव्हेंबरपासून DGCA ने पायलट्सच्या फ्लाइट आणि विश्रांती वेळेबाबतचे नवे नियम लागू केले. त्यात पायलट्सच्या उड्डाण तासांवर मर्यादा आणण्यात आली, रात्रीच्या उड्डाणांवर बंधने लागू झाली आणि विश्रांती कालावधी वाढवण्यात आला.
नवे नियम सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. पण इंडिगोचे संपूर्ण नेटवर्क या नव्या चौकटीत बसू शकले नाही. परिणामी, विमाने उपलब्ध आहेत, पण पण त्यांना उडवण्यासाठी क्रू उपलब्ध नाही. नवीन नियमांमुळे रोस्टर पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या इंडिगोला तातडीने आणखी पायलट्सची आवश्यकता आहे, पण एक-दोन दिवसांत पायलट्स आणणे शक्य नाही. त्यामुळेच फ्लाइट्स रद्द कराव्या लागत आहेत.
एअरपोर्टवरील तांत्रिक बिघाड
दिल्ली आणि पुणे विमानतळावर चेक-इन आणि डिपार्चर सिस्टममध्ये बिघाड झाला. इंडिगोसारख्या मोठ्या नेटवर्कमध्ये एक तासाचा लेटही देशभरातील उड्डाणांना डिस्टर्ब करतो. अशातच, हिवाळा आणि प्रवाशांची वाढलेली गर्दी, ज्यामुळे ग्राउंड स्टाफवर प्रचंड दबाव आहे. इंडिगोचे टाईट शेड्यूल या दबावाखाली ढासळू लागले आहे. विशेष म्हणजे, फक्त इंडिगो नाही, तर Air India, Vistara, Akasa सारख्या कंपन्यांनादेखील याचा फटका बसतोय, पण इंडिगोच्या तुलनेने कमी.
Web Summary : Indigo faces crisis with flight cancellations due to new pilot regulations and airport glitches. Passenger frustration rises as schedules are disrupted. Recovery timeframe uncertain.
Web Summary : इंडिगो को नए पायलट नियमों और हवाई अड्डे की गड़बड़ियों के कारण उड़ान रद्द होने से संकट का सामना करना पड़ रहा है। शेड्यूल बाधित होने से यात्रियों में निराशा बढ़ रही है। सुधार की समयसीमा अनिश्चित है।