अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध भारतासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. या दोन्ही देशांत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे भारताला लॉटरी लागली आहे. मे २०२५ मध्ये भारताच्या व्यापारात काही चांगले बदल दिसून आले आहेत. वाणिज्य मंत्रालयानुसार, मे महिन्यात भारताची एकूण निर्यात ७१.१२ अब्ज डॉलर्स होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २.७७ टक्क्यांनी अधिक मोठा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हा आकडा ६९.२० अब्ज डॉलर्स होता. यामुळे व्यापार तूटही कमी झाली. मे महिन्यात व्यापार तूट ६.६२ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाली. जी गेल्या वर्षी ९.३५ अब्ज डॉलर्स होती.
याशिवाय, अमेरिकेसोबत होणाऱ्या निर्यातीसंदर्भात बोलायचे झाल्यास, यात भारताने चीनला मागे टाकले आहे. चीनकडून अमेरिकेला होणारी निर्यात मे 2025 मध्ये 34.5 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातील 17.3 टक्क्यांची झाली आहे. मात्र, संपूर्ण जगाचाविचार करता चीनच्या निर्यातीत काहीशी तेजी आली आहे. चीनची एकूण निर्यात वाढून 4.6% झाला आणि जी 316.2 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचते.
भारतासह इतर देशांसोबत निर्यात वाढली -अमेरिकेसोबतच्या निर्यातीतील घट भरून काढण्यासाठी चीनने इतर देशांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. चीनने युरोपियन युनियन, आसियान आणि भारतामध्ये निर्यात वाढवली आहे. केवळ भारतात होणारी निर्यातच १२.४% वाढून ११.१३ अब्ज डॉलर्स झाली आहे. यामुळे डंपिंगचा धोका वाढला आहे. डंपिंग अर्थात एखादा देश आपला माल दुसऱ्या देशाला स्वस्त दरात विकतो.
ट्रेड वॉरचा फायदा -अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. टॅरिफसंदर्भातील चर्चा, हा ट्रेड वॉरशी संबंधित एक महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांनी टॅरिफ वाढवले आहे. याच्या प्रत्युत्तरात चीननेही टॅरीफ वाढवले आहे. यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक तणाव वाढला आहे.