India GDP: केंद्र सरकारकडून जर नवीन GDP बेस इयर स्वीकारण्यात आला, तर आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये भारताची आर्थिक वाढ (GDP Growth) सध्याच्या अंदाजांपेक्षा अधिक राहू शकते, असा अंदाज State Bank of India (SBI) च्या ताज्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार, FY26 मध्ये भारताचा GDP वाढ दर 7.4% वरून 7.5% किंवा त्याहून अधिक जाऊ शकतो.
सध्याचा अधिकृत GDP अंदाज काय सांगतो?
National Statistical Office (NSO) च्या पहिल्या अॅडव्हान्स अंदाजानुसार, FY26 साठी रिअल GDP ग्रोथ 7.4% राहण्याचा अंदाज आहे. तर, FY25 मध्ये ही वाढ 6.5% होती. तसेच, ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (GVA) ग्रोथ 7.3% आणि नॉमिनल GDP ग्रोथ 8% राहण्याची शक्यता आहे. SBI च्या मते, हे अंदाज सध्या वास्तववादी आहेत, मात्र नवीन बेस इयरमुळे यात सुधारणा होऊ शकते.
GDP बेस इयर बदलल्यास काय परिणाम होईल?
SBI अहवालात नमूद करण्यात आले आहे की GDP बेस इयर 2022-23 वर अपडेट केल्यास, अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांची वास्तविक कामगिरी अधिक अचूकपणे दिसून येईल. यामुळे FY26 साठी GDP ग्रोथचा दर 7.5% च्या आसपास किंवा त्याहून जास्त नोंदवला जाऊ शकतो. बँकेनुसार, NSO चा दुसरा अॅडव्हान्स अंदाज 27 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार असून, त्यामध्ये अधिक डेटा आणि बेस इयर बदलाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.
RBI आणि NSO च्या अंदाजांतील फरक मर्यादित
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, ऐतिहासिकदृष्ट्या Reserve Bank of India (RBI) आणि NSO यांच्या GDP वाढीच्या अंदाजांमध्ये फरक नेहमीच 20 ते 30 बेसिस पॉइंट्स इतक्याच मर्यादेत राहिला आहे. त्यामुळे सध्याचे अंदाज फारसे बदलणार नाहीत, मात्र थोडी वाढ शक्य आहे.
प्रति व्यक्ती उत्पन्नात लक्षणीय वाढीची शक्यता
SBI अहवालानुसार, FY26 मध्ये प्रति व्यक्ती राष्ट्रीय उत्पन्न सुमारे ₹16,025 ने वाढून ₹2,47,487 होण्याची शक्यता आहे. ही वाढ भारताच्या आर्थिक गतीचे स्पष्ट संकेत देते.
क्षेत्रनिहाय वाढीचा अंदाज
शेती
FY26 मध्ये वाढ केवळ 3.1%
FY25 मध्ये ही वाढ 4.6% होती
शेती व संलग्न क्षेत्रांमध्ये मंदी कायम राहण्याची शक्यता
सेवा क्षेत्र
FY26 मध्ये तब्बल 9.1% वाढीचा अंदाज
FY25 मध्ये सेवा क्षेत्राची वाढ 7.2% होती
सर्व सेवा उपक्षेत्रांमध्ये मागील वर्षापेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित
उद्योग क्षेत्र
FY26 मध्ये 6.0% औद्योगिक वाढ
FY25 मध्ये 5.9%
यामागे 7.0% मजबूत मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटचा आधार
खाण उद्योग
FY26 मध्ये 0.7% घट होण्याचा अंदाज
FY25 मध्ये या क्षेत्रात 2.7% वाढ नोंदवली होती
पुढील काळात बदल संभव
SBI च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, GDP बेस इयरमध्ये होणारे बदल, अधिक अद्ययावत डेटा आणि सुधारित सांख्यिकी पद्धती यांमुळे भविष्यातील GDP आणि GVA वाढीच्या अंदाजांमध्ये आणखी बदल होऊ शकतात.
Web Summary : SBI predicts India's FY26 GDP growth could surpass 7.4% due to a revised GDP base year. While NSO estimates 7.4% growth, SBI suggests it may reach 7.5% or higher. Per capita income is also expected to rise significantly, indicating strong economic momentum. Service sector growth is projected to be robust.
Web Summary : एसबीआई का अनुमान है कि संशोधित जीडीपी आधार वर्ष के कारण वित्त वर्ष 26 में भारत की जीडीपी वृद्धि 7.4% से अधिक हो सकती है। एनएसओ का अनुमान 7.4% है, लेकिन एसबीआई का कहना है कि यह 7.5% या उससे अधिक तक पहुंच सकता है। प्रति व्यक्ति आय में भी उल्लेखनीय वृद्धि होने की उम्मीद है, जो मजबूत आर्थिक गति का संकेत देती है। सेवा क्षेत्र की वृद्धि मजबूत रहने का अनुमान है।