Strategic Petroleum Reserves : मध्यपूर्वेतील इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता विक्राळ रूप धारण केले असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या 'होर्मुझ' सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्यास भारताकडे केवळ ४० ते ४५ दिवस पुरेल इतकाच कच्चे तेलाचा साठा उपलब्ध आहे. 'केप्लर' या एनर्जी अॅनालिटिक्स फर्मने दिलेल्या या आकडेवारीने सरकार आणि रिफायनरी कंपन्यांची चिंता वाढवली आहे.
'होर्मुझ'वर भारताचे ५०% अवलंबित्वभारत आपल्या एकूण गरजेच्या सुमारे ८८% कच्चे तेल आयात करतो. त्यापैकी ५० ते ५५% आयात इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत यांसारख्या देशांतून होते. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी दररोज सुमारे २५ ते २७ लाख बॅरल तेल याच संकुचित मार्गातून येते. केवळ तेलच नाही, तर कतारकडून येणारा गॅस पुरवठाही याच मार्गावर अवलंबून आहे. सरकारी आकडेवारीनुसार सर्व साठे मिळून ७४ दिवसांचा बॅकअप असला तरी, 'केप्लर'च्या मते व्यावसायिक साठा केवळ ४५ दिवसांचाच आहे.
महागाईचा धोकाइराण संकटामुळे जागतिक बाजारात 'ब्रेंट क्रूड'चे दर प्रति बॅरल ८० डॉलरच्या पार गेले आहेत. गेल्या काही दिवसांत यात १०% वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये भारताने तेल आयातीवर १३७ अब्ज डॉलर खर्च केले होते. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल-जानेवारी) १००.४ अब्ज डॉलर आधीच खर्च झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरवर गेल्यास रुपया अधिक कमकुवत होईल आणि देशांतर्गत महागाईचा भडका उडेल.
वाचा - युद्ध इकडे, झळा तिकडे! मध्यपूर्वेतील तणावामुळे भारताचे ४ दिवसांत २,००० कोटींचे नुकसान
भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
- रशियावर भिस्त: समुद्रात तरंगणारे रशियन कार्गो तातडीने खरेदी करून पुरवठा सुरळीत ठेवता येईल.
- पर्यायी देश: पश्चिम आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेकडून आयात वाढवावी लागेल.
- निर्यात बंदी: रिफायनरींकडून होणारी डिझेल आणि जेट फ्युएलची निर्यात थांबवून तो साठा देशांतर्गत वापरासाठी वळवावा लागेल.
- लांबच्या मार्गावरून तेल आणल्यास विमा आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढेल.
Web Summary : India faces potential fuel shortages due to Middle East tensions disrupting oil supplies. With only 45 days of commercial crude reserves, reliance on Hormuz Strait poses risks. Rising crude prices threaten inflation, prompting exploration of alternative suppliers and export controls.
Web Summary : मध्य पूर्व तनाव से तेल आपूर्ति बाधित होने के कारण भारत में ईंधन की कमी का खतरा है। होर्मुज जलडमरूमध्य पर निर्भरता जोखिम पैदा करती है, क्योंकि केवल 45 दिनों का वाणिज्यिक कच्चा तेल भंडार है। बढ़ते कच्चे तेल की कीमतें मुद्रास्फीति को खतरे में डालती हैं, जिससे वैकल्पिक आपूर्तिकर्ताओं और निर्यात नियंत्रणों की खोज हो रही है।