लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मोठ्या शहरांमध्ये लोक वैद्यकीय उपचार आणि लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पर्सनल लोन घेत आहेत, तर लहान शहरांमध्ये, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. महानगरांमध्ये ७% लोक दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात, तर लहान शहरांमध्ये १६% लोक दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. पैसाबाजारच्या ‘द पर्सनल लोन स्टोरी’ अहवालानुसार, महानगरांमध्ये १४% लोक आणि लहान शहरांमध्ये ८% लोकांनी वैद्यकीय उपचारांसाठी पर्सनल लोन घेतले आहे. देशातील २३ शहरांतील २,८८९ जणांना अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
अहवालानुसार, धक्कादायक बाब म्हणजे, भारतात उपचारांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी सुमारे ४०% खर्च रुग्णांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो, कारण आजही विमा कवच मर्यादित आहे.
का घेताहेत पर्सनल लोन
- रोजच्या गरजांसाठी - ४८%
- चैनीसाठी - ३६%
- व्यवसाय करण्यासाठी - १६%
कोणती गरज पूर्ण हाेते?
- रोजच्या गरजांसाठी ११%
- उपचारांसाठी ११%
- घर दुरुस्तीसाठी ११%
- शिक्षणासाठी ०५%
- जुन्या कर्जासाठी ०४%
- इतर गरजा ०६%
कर्जफेडीची शिस्त आहे का?
- ८% कधी तरी हप्ता चुकतो
- ९२% हप्ता चुकत नाही
‘इन्स्टंट’ कर्जाची ओढ
तरुण पिढीमध्ये कर्जाचा वापर सर्वाधिक वाढला. या पिढीतील २५% लोक कोणतेही पर्यायी मार्ग न शोधता‘इन्स्टंट लोन’ला पसंती देतात. विशेष म्हणजे १०% तरुण केवळ आकर्षक ‘लो-इंटरेस्ट ऑफर’ आहे म्हणून कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे. ७.५० लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेले ४०% लोक चांगल्या जीवनशैलीसाठी कर्ज घेत आहेत.
कुणाच्या गरजा काय?
| कर्जाचे कारण | टिअर १ | टिअर २ | टिअर ३ |
| रोजची गरज | ०७ | १३ | १६ |
| उपचार | १४ | १० | ०८ |
| घर दुरुस्ती | ०८ | १३ | १० |
| लग्नासाठी | १४ | १० | ०७ |
| डिस्काउंटसाठी | ०३ | ०४ | ०६ |
(इतके लोक पर्सनल लोन घेत आहेत, एकूण पर्सनल लोनमध्ये टक्केवारीत वाटा)
Web Summary : Personal loans in India are rising, particularly for medical expenses, weddings, and lifestyle upgrades. A significant portion goes towards daily needs, especially in smaller cities. Surprisingly, many young adults opt for instant loans due to attractive offers, leading to debt for lifestyle improvements.
Web Summary : भारत में पर्सनल लोन बढ़ रहे हैं, खासकर चिकित्सा खर्च, शादियों और जीवनशैली को बेहतर बनाने के लिए। एक महत्वपूर्ण हिस्सा दैनिक जरूरतों को पूरा करने के लिए जाता है, खासकर छोटे शहरों में। हैरानी की बात है कि कई युवा आकर्षक ऑफर के कारण तत्काल लोन का विकल्प चुनते हैं, जिससे जीवनशैली में सुधार के लिए कर्ज होता है।