Join us

TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:42 IST

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय निर्यात आणि कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीतून गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी शेअर्सची विक्री केली.

Stock Market News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला. गुरुवारी बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. दिवसभरच्या कामकाजाअंती बीएसई सेन्सेक्स ७०६ अंकांनी घसरून ८०,०८१ च्या पातळीवर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी ५० सुद्धा २११ अंकांनी घसरून २४,५०१ वर आला.

या घसरणीचा सर्वाधिक फटका आयटी, हेल्थकेअर, रिअल्टी आणि एफएमसीजी क्षेत्राला बसला. एचसीएल टेकचे शेअर ३% तर टीसीएस २% नी घसरले. इतर सेक्टोरल इंडेक्सही लाल निशाणीवर बंद झाले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय निर्यात आणि कंपन्यांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे, याच भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केली.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?

  • सेन्सेक्स ७०६ अंकांनी घसरून ८०,०८१ च्या पातळीवर बंद झाला.
  • निफ्टी २११ अंकांनी घसरून २४,५०१ च्या पातळीवर बंद झाला.
  • निफ्टी बँक ६३० अंकांनी घसरून ५३,८२० च्या पातळीवर बंद झाला.
  • निफ्टी मिडकॅप इंडेक्स ७१९ अंकांनी घसरून ५६,०४८ च्या पातळीवर बंद झाला.

घसरणीची प्रमुख कारणे

  1. अमेरिकेचे टॅरिफ: अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफमुळे बाजारात नकारात्मक वातावरण कायम आहे.
  2. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरू आहे.
  3. जागतिक संकेत: आशियाई बाजारातील कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारावरही दबाव वाढला.
  4. ऑगस्ट सिरीजची समाप्ती: मासिक सिरीजच्या एक्सपायरीमुळे बाजारात अस्थिरता वाढली.

वाचा - ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?

कोणत्या शेअर्समध्ये मोठी हालचाल?इंटरग्लोब एव्हिएशन (IndiGo) मध्ये ब्लॉक डीलद्वारे प्रवर्तकाने २.२% हिस्सा विकल्यानंतर, शेअरमध्ये ५% घसरण झाली.एजीएमच्या आधी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २% वाढीसह बंद झाला, ज्याने बाजारात सकारात्मक भावना टिकवून ठेवली.ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. मागील ३ दिवसांत हा शेअर १६% ने वाढला आहे.एफ अँड ओ (F&O) मधून बाहेर पडलेल्या एबी फॅशन, अदानी टोटल आणि आयआरबी इन्फ्रा यांसारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकटॅरिफ युद्ध