Join us  

भारतीय सेवा क्षेत्रातील वृद्धी सात महिन्यांच्या नीचांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:18 AM

भारतातील सेवा क्षेत्राचा एप्रिलमधील वृद्धीदर घसरून सात महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. नव्या व्यवसाय वाढीतील नरमाई आणि निवडणुकांमुळे विस्कळीत झालेला व्यवसाय यामुळे ही घसरण झाली आहे.

नवी दिल्ली : भारतातील सेवा क्षेत्राचा एप्रिलमधील वृद्धीदर घसरून सात महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. नव्या व्यवसाय वाढीतील नरमाई आणि निवडणुकांमुळे विस्कळीत झालेला व्यवसाय यामुळे ही घसरण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अर्थव्यवस्थेतील स्थिती सामान्य होईल, असे एका अहवालात म्हटले आहे.‘निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मार्चमध्ये ५२ अंकांवर असलेला ‘पीएमआय’ निर्देशांक एप्रिलमध्ये ५१ अंकांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरनंतरचा हा नीचांक ठरला आहे. सेवा क्षेत्राच्या ‘पीएमआय’मध्ये घसरण झाली असली तरी सलग ११ व्या महिन्यात तो विस्तार दर्शवित आहे. पीएमआय ५० अंकांच्या वर असल्यास विस्तार अथवा वाढीचा निदर्शक मानला जातो. पीएमआय ५० च्या खाली असल्यास अर्थव्यवस्थेत घसरण झाल्याचे समजले जाते. आयएचएस मार्केटच्या प्रधान अर्थतज्ज्ञ तथा अहवालाच्या लेखिका पोलियान्ना डी लिमा यांनी सांगितले की, भारतातील खाजगी क्षेत्र कमजोर वृद्धी दर्शवित असले तरी यातील बरीचशी मंदी निवडणुकांच्या अडथळ्यामुळे निर्माण झाली आहे. निवडणुकांनंतर नवे सरकार स्थापन होताच परिस्थितीत सुधारणा होईल, असे कंपन्यांना वाटते.एप्रिलमध्ये रोजगारांच्या संधींत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नव्या कामातील सुधारणा आणि वृद्धी अंदाजातील आश्वासकता यामुळे ही वाढ झाली आहे.'केवळ निवडणुका हे कारण नाही

टॅग्स :व्यवसायभारत