Rupee vs Dollar Impact : भारतीय रुपयासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने रुपया प्रति डॉलर ९२ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता असून, आयातदार, विद्यार्थी आणि पर्यटकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
रुपयाची घसरगुंडी: वर्षभराचा प्रवासजानेवारी २०२६ या एकाच महिन्यात रुपया २ टक्क्यांहून अधिक (२०२ पैसे) कमकुवत झाला आहे. तर संपूर्ण २०२५ या वर्षात रुपयात ५ टक्क्यांची घसरण झाली होती. या घसरणीमागे प्रामुख्याने दोन मोठी कारणे आहेत.
- शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्रमी विक्री.
- जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलरचे वाढलेले मूल्य.
कोणाला फटका आणि कोणाची चांदी?आयातदार आणि सामान्य नागरिक
- भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ८५% तेल आयात करतो. कच्च्या तेलासाठी आता अधिक डॉलर मोजावे लागणार असल्याने पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन महाग होईल.
- महाग होणाऱ्या वस्तू : मोबाईल सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, रसायने, खाद्यतेल आणि खते महागणार आहेत.
- शिक्षण आणि पर्यटन : परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जास्त फी भरावी लागेल, तसेच विदेशी सहलींसाठी डॉलर खरेदी करणे खर्चिक होणार आहे.
निर्यातदार आणि अनिवासी भारतीयज्या कंपन्या वस्तूंची निर्यात करतात, त्यांना डॉलरच्या बदल्यात जास्त रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांचा नफा वाढू शकतो. विशेषतः टेक्सटाईल (कापड) सारख्या क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल, कारण त्यांची आयातीवर अवलंबून राहण्याची गरज कमी आहे. तसेच, परदेशातून भारतात पैसे पाठवणाऱ्या एनआरआय बांधवांच्या कुटुंबीयांनाही जास्त पैसे मिळतील.
वाचा - श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड
व्यापार तूट आणि उद्योगांची स्थितीडिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, भारताची व्यापार तूट २५.०४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाची आयात ६ टक्क्यांनी वाढली असून चांदीची आयात चक्क ८० टक्क्यांनी उसळली आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि जेम्स अँड ज्वेलरी सारख्या क्षेत्रांना रुपयाच्या घसरणीचा फायदा कमी होतो, कारण त्यांना कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आयात करावा लागतो आणि वाढलेला उत्पादन खर्च त्यांचा नफा खाऊन टाकतो.
Web Summary : The rupee hit a historic low of 92 against the dollar due to foreign investment outflows and a strong US dollar. This depreciation is likely to fuel inflation, impacting importers, students, and tourists while benefiting exporters and NRIs. Trade deficit rises, affecting industries dependent on imports.
Web Summary : विदेशी निवेश के बहिर्वाह और मजबूत अमेरिकी डॉलर के कारण रुपया डॉलर के मुकाबले 92 के ऐतिहासिक निचले स्तर पर पहुंच गया। इस गिरावट से मुद्रास्फीति बढ़ने की संभावना है, जिससे आयातकों, छात्रों और पर्यटकों पर असर पड़ेगा, जबकि निर्यातकों और एनआरआई को लाभ होगा। व्यापार घाटा बढ़ता है, जिससे आयात पर निर्भर उद्योग प्रभावित होते हैं।