नवी दिल्लीः भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी एका मोठं पाऊल उचललं आहे. जर ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. 1 मेपासून हा नवा नियम लागू होणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु यासाठी एक अटही घालण्यात आली आहे. अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.येत्या 1 मेपासून रेल्वे तिकिटासंदर्भातील नियम बदलणार आहेत. 1 मेपासून ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी आपल्याला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. प्रवासादरम्यान बोर्डिंग स्टेशन बदललं आणि त्यानंतर ते तिकीट रद्द केल्यास त्यावर आपल्याला रिफंड मिळणार नाही. सध्या अशा प्रकारे आरक्षित तिकिटाचं बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही. परंतु 1 मेनंतर हे शक्य होणार आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांवरून 4 तासांवर आणला आहे. 1 मेपासून ट्रेन सुरू होण्याच्या 4 तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.
1 मेपासून तिकीट रिझर्व्हेशनचे नियम बदलणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 08:50 IST