Join us

रेल्वेचे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकीट काय आहे? जाणून घ्या फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 19:30 IST

आपली सीट रिझर्व्ह करण्यासाठी अनेकजण तत्काळ तिकीटाचा पर्याय निवडतात.

Indian Railway Premium Tatkal: भारतीय रेल्वेतून दररोज तीन कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे. रेल्वेकडून दररोज 22 हजारांहून अधिक गाड्या चालवल्या जातात. त्यापैकी 13 हजारांहून अधिक गाड्या पॅसेंजर गाड्या आहेत. अनेकदा लांबच्या प्रवासासाठी रिझर्व्हेशन काढले जाते. रिझर्व्हेशनच्या डब्यांमध्ये प्रवास करणे सोयीचेच नाही तर सुरक्षितही आहे.

मात्र अनेवेळा ट्रेनमध्ये रिझर्व्हेशन तिकीट मिळत नाही. अशावेळी तत्काळ तिकीटाचा पर्याय उपलब्ध असतो. तत्काळ तिकीटाचे दर सामान्य दरापेक्षा थोडे जास्त आहे. पण काहीवेळा तत्काळ तिकीटदेखील मिळत नाही. अशा परिस्थितीत काहीजण प्रीमियम तत्काळ पर्याय निवडतात. प्रीमियम तत्काळपेक्षाही महाग आहे. 

येथे मागणीनुसार तिकिटांची किंमत बदलत राहते. या प्रीमियम तत्काळचे बुकिंगदेखील सामान्य तत्काळप्रमाणे एक दिवस आधी सुरू होते. तत्काळप्रमाणेच यातही तुम्हाला सामान्य सीट मिळते. फरक इतकाच आहे की, यामध्ये तुम्हाला इन्स्टंट चार्जपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. त्याचे बुकिंग फक्त IRCTC च्या अधिकृत ॲप किंवा साइटवरून केले जाऊ शकते.

टॅग्स :भारतीय रेल्वेजरा हटके