Join us

IRFC च्या शेअरला लागलं अपर सर्किट, सरकारच्या 'या' नियमानंतर स्टॉकमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:50 IST

IRFC SHARES : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) शेअर्समध्ये थेट अपर सर्किट लागलं आहे.

IRFC SHARES : महिन्याभरापासून निराश करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आज सकाळी सुखद धक्का दिला. सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये जोरदार वाढ झाली. वास्तविक, बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वेगाने खाली आहे. दरम्यान, आज PSU शेअर्समध्येही वाढ दिसून आली. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) मध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. वास्तविक, अर्थ मंत्रालयाने ८ वर्षांनंतर PSU कंपन्यांच्या भांडवलाच्या पुनर्रचनेचे नियम बदलले आहेत. दुसरीकडे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

६ टक्के वाढमंगळवारी, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे (IRFC) शेअर्स सोमवारच्या १३८.२९ रुपयांच्या बंद किमतीवरून ६ टक्क्यांनी वाढले आणि १४६.९६ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. शेअर्स अचानक वाढण्याचे कारण म्हणजे अर्थ मंत्रालयाने ८ वर्षांनंतर शेअर बायबॅक, डिव्हिडंड पेमेंट, बोनस इश्यू आणि PSU कंपन्यांचे स्टॉक स्प्लिट यासंबंधीचे नियम बदलले आहेत. IRFC चे शेअर्स २९ नोव्हेंबरपासून फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&) स्पेसमध्ये ट्रेडिंग सुरू करतील.

काय आहेत नवीन नियम?सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PSU कंपन्यांकडे आता विस्तारासाठी अधिक रोख असणार आहे. या कंपन्यांना करोत्तर नफ्याच्या किमान ३० टक्के किंवा एकूण निव्वळ संपत्तीच्या ४ टक्के भागधारकांना लाभांश म्हणून देणे बंधनकारक असेल. त्याच वेळी, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना करानंतर नफ्याच्या ३० टक्के लाभांश म्हणून सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी नेटवर्थच्या ४ टक्के लाभांशाचा नियम रद्द करण्यात आला आहे. बायबॅकबद्दल बोलायचे झाले तर, सरकारी कंपन्या GPSE, ज्यांच्या शेअरची किंमत गेल्या सलग ६ महिन्यांपासून बुक व्हॅल्यूपेक्षा कमी आहे आणि ज्याची एकूण संपत्ती किमान ३,००० कोटी रुपये आहे आणि रोख आणि बँक शिल्लक रुपये १,५०० कोटींहून अधिक आहे. अशा स्थितीत या कंपन्यांनी शेअर्स बायबॅकचा विचार करावा. याशिवाय सरकारने अनेक नियमांमध्ये बदलही केले आहेत.

टॅग्स :भारतीय रेल्वेशेअर बाजारशेअर बाजार