Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय AI मॉडल Sarvam Edge नं 'गेम'च बदलला; फोन, लॅपटॉपवर विना इंटरनेट काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:42 IST

Sarvam Edge AI Model: भारतीय एआय स्टार्टअप 'सर्वम एआय'नं आपलं नवीन ऑन-डिव्हाइस आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म 'सर्वम एज' लाँच केलंय. पाहा काय आहे यामध्ये खास.

Sarvam Edge AI Model: भारतीय एआय स्टार्टअप 'सर्वम एआय'नं (Sarvam AI) आपलं नवीन ऑन-डिव्हाइस आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म 'सर्वम एज' (Sarvam Edge) लाँच केलंय. हे प्लॅटफॉर्म खास करून स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या दैनंदिन उपकरणांवर थेट काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलंय आहे.

याचं सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे हे चालवण्यासाठी क्लाउड सर्व्हरची किंवा इंटरनेट कनेक्शनची कोणतीही गरज नाही. कंपनीच्या मते, सध्याचे स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप इतके सक्षम झाले आहेत की ते प्रगत एआय मॉडेल्स स्थानिक पातळीवर चालवू शकतात. जेव्हा एआय प्रोसेसिंग थेट डिव्हाईसवर होतं, तेव्हा नेटवर्कचा विलंब संपतो, कामगिरी अधिक स्थिर राहते आणि वापरकर्त्याचा डेटा पूर्णपणे ऑफलाइन सुरक्षित राहतो.

२० रुपयांपर्यंत येऊ शकतो Ola Electric चा शेअर; ब्रोकरेजचा मोठा इशारा, स्टॉकमध्ये आणखी झाली घसरण

१० भारतीय भाषांमध्ये व्हॉइस रिकग्निशनची सुविधा

'सर्वम एज' मध्ये बहुभाषिक स्पीच रिकग्निशन, टेक्स्ट-टू-स्पीच आणि ट्रान्सलेशन मॉडेल्सचा समावेश आहे. याचं एकच स्पीच रिकग्निशन मॉडेल १० प्रमुख भारतीय भाषांना सपोर्ट करतं आणि त्यात आपहून भाषा ओळखण्याची (Automatic Language Detection) सुविधा आहे. म्हणजेच युझरला भाषा निवडण्याची गरज भासणार नाही, सिस्टीम स्वतःच भाषा ओळखून घेईल. टेक्स्ट-टू-स्पीच फीचर देखील याच भाषांमध्ये काम करतं आणि एकसमान आवाज आउटपुट देतं. ट्रान्सलेशन सिस्टम इंग्रजीसह ११ भाषांना सपोर्ट करतं. हे सर्व इंटरनेट कनेक्शनशिवाय शक्य आहे.

कमी खर्चावर विशेष भर

ऑन-डिव्हाइस एआयचा अर्थ असा आहे की प्रत्येक क्वेरीसाठी क्लाउड सर्व्हरचा खर्च येणार नाही. यामुळे खर्चात कपात होईल आणि डेटा गोपनीयता देखील मजबूत होईल. कमकुवत नेटवर्क किंवा इंटरनेट नसलेल्या भागातही हे तंत्रज्ञान सहजपणे काम करू शकेल. सर्वम एआयच्या मते, 'सर्वम एज' शिक्षण, सुलभता, वित्त आणि दैनंदिन उत्पादकतेमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते. भविष्यातील डिजिटल अनुभवांमध्ये ऑन-डिव्हाइस इंटेलिजन्सला मुख्य भाग बनवण्याच्या दिशेनं हे प्लॅटफॉर्म एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sarvam Edge AI: Indian model works offline on phones, laptops.

Web Summary : Sarvam AI launched Sarvam Edge, an on-device AI platform for smartphones and laptops. It supports 10 Indian languages for voice recognition and translation without internet, cutting costs and boosting data privacy. This innovation promises to transform various sectors.
टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सभारत