Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्तरावर बुलेट ट्रेन कोचेसचे उत्पादन व निर्यात करण्यास उत्सुक, भारताचा जपानकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 03:34 IST

जपानमध्ये शिकांसेन रेल्वेची आॅपरेटिंग किंमत कमी करण्याच्या उद्देशाने भारताने जपानसमोर बुलेट ट्रेनच्या कोचेसची निर्मिती देशात करून निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.

फुकुओका (जपान) - जपानमध्ये शिकांसेन रेल्वेची आॅपरेटिंग किंमत कमी करण्याच्या उद्देशाने भारताने जपानसमोर बुलेट ट्रेनच्या कोचेसची निर्मिती देशात करून निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.भारतात पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडोर मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान तयार करण्यात येत असून २०२२ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. प्रारंभी भारत जपानकडून १८ शिकांसेन ट्रेन ७ हजार कोटी रुपयांत खरेदी करणार आहे. हायस्पीड रेल्वेवर आयोजित परिषदेत रेल्वे बोर्डाचे सदस्य (रोलिंग स्टॉक) राजेश अग्रवाल म्हणाले, बुलेट ट्रेनचे कोचेस स्थानिक स्तरावर तयार करण्यासाठी जपानने तांत्रिक सहाय्य करावे, असा प्रस्ताव दिला आहे. यात यशस्वी झालो तर आम्हाला कोचेसची निर्मिती कमी किमतीत करता येईल आणि किंमत जगात सर्वाधिक स्वस्त असेल. त्यानंतर आम्हाला जगभरासाठी कोचेसची निर्मिती करणे शक्य होईल. चीनच्या तुलनेत जास्तीत जास्त देश आमच्याकडून कोचेस खरेदी करतील. केवळ दक्षिण-पूर्वोत्तर देश नव्हे तर युरोप आणि अमेरिकासुद्धा आमच्याकडून खरेदी करतील. अशा प्रकारच्या कोचेसच्या निर्मितीसाठी रायबरेली येथे आधुनिक कोच कारखाना पूर्णपणे तयार आहे. रेल्वेकडे जवळपास १.५ लाख कुशल कामगार, ५० रेल्वे वर्कशॉप आणि सहा उत्पादन युनिट आहेत.अग्रवाल म्हणाले, जपान भारतात केवळ रेल्वेच्या रोलिंग स्टॉकची (इंजिन, कोच) निर्मिती करण्यासह उत्पादन प्रकल्पाचा उपयोग संरक्षण आणि अन्य क्षेत्रासाठी उत्पादन करण्यास करता येईल. भारतात तयार होणाºया हायस्पीड रेल्वे नेटवर्कची लांबी ५०८ कि़मी. आहे. या मार्गावर १२ स्टेशन राहतील. त्यातील सुमारे ३५० कि़मी. मार्ग गुजरातेत आणि १५० कि़मी. महाराष्ट्रात राहील. प्रत्येक बुलेट ट्रेनमध्ये १० कोच राहणार असून त्यात एक बिझनेस क्लास आणि नऊ सामान्य श्रेणीचे राहणार आहेत. प्रती व्यक्ती किमान भाडे २५० रुपये आणि कमाल तीन हजार रुपये राहण्याची शक्यता आहे. प्रकल्पासासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे.जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामात्सु यांनी सांगितले की, शिकांसेन ट्रेनची निर्मिती स्थानिक स्तरावर करण्याबाबत बोलणी सुरू आहे. त्याची निर्मिती स्थानिक स्तरावर सर्वोत्तम राहील आणि या संदर्भात गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. हे पाऊल यशस्वी ठरले तर राज्यांसाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होणार आहे. हायस्पीड रेल्वे नेटवर्क क्षेत्रात जगात अनेक संधी आहेत.

टॅग्स :बुलेट ट्रेनभारतजपान