Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK: भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कप सामन्याचा फिव्हर: फक्त ४ तासांचा प्रवास, विमान भाडं एक लाखाच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:12 IST

Mumbai to Colombo Flight Price Sour: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२६ चा महामुकाबला १५ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

India vs Pakistan T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२६ चा महामुकाबला १५ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. मात्र, या सामन्यापूर्वीच कोलंबोला जाणाऱ्या विमानांच्यातिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. जर तुम्ही शनिवार किंवा रविवारी विमानानं कोलंबोला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका सोसावा लागेल. मेकमायट्रिपनुसार, एअर इंडियाच्या विमानाचं भाडे एक लाख रुपयांच्या पुढे गेलं आहे. दिल्ली ते कोलंबो हा प्रवास पूर्ण करण्यासाठी विमानाला साधारणपणे ४ तास लागतात.

दिल्ली आणि मुंबईवरून कोलंबोला जाण्याचा खर्च

मंगळवारी विमानाचे दर पाहिले असता, दिल्ली ते कोलंबो प्रवासासाठी शुक्रवारी एअर इंडियाच्या नॉनस्टॉप फ्लाईटचे भाडे ६३,०३० ते ८१,०३२ रुपये होतं, तर श्रीलंकन एअरलाईन्सचे भाडे ३२,७४६ रुपये होतं. शनिवारसाठी एअर इंडियाचे दर ९०,०३१ ते १,०९,३४० रुपयांच्या दरम्यान पोहोचले, तर श्रीलंकन एअरलाईन्सचे भाडे १,४५,२२० रुपये होतं. रविवारी सामन्याच्या दिवशी एअर इंडियाचे भाडे १,०९,३४० रुपये आहे. मुंबईवरून प्रवास करणाऱ्यांसाठीही दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी मुंबई ते कोलंबोसाठी इंडिगोचं भाडे २२,९४३ रुपये आणि एअर इंडियाचं भाडं २८,०३५ रुपये होतं. मात्र, शनिवारी इंडिगोचं भाडं ४७,८१८ रुपये, श्रीलंकन एअरलाईन्सचे ५६,५२५ ते ६३,३७७ रुपये आणि एअर इंडियाचे दर ८०,०३१ रुपयांपर्यंत वाढले आहेत. रविवारी श्रीलंकन एअरलाईन्सचे भाडे ६६,१२३ रुपये इतकं दिसत होतं.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगासमोरील संकट

श्रीलंकेचा पर्यटन उद्योग सध्या संकटातून जात आहे. श्रीलंकेच्या सेंट्रल बँकच्या अहवालानुसार, पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊनही उत्पन्नात घट झाली आहे. जानेवारी २०२६ मध्ये पर्यटकांकडून होणाऱ्या कमाईत वार्षिक ५.६% ची घट नोंदवण्यात आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये श्रीलंकेला पर्यटनातून ४००.७ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली होती, जी जानेवारी २०२६ मध्ये घसरून ३७८.३ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. अशा परिस्थितीत, भारत-पाकिस्तान सामन्यामुळे मोठ्या संख्येने लोक श्रीलंकेत येतील आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मदत करतील, अशी आशा श्रीलंकेला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan T20 World Cup fever: Flight prices soar to Colombo.

Web Summary : Ahead of the India-Pakistan T20 World Cup match in Colombo, flight prices have skyrocketed, exceeding ₹1 lakh. Despite rising tourism, Sri Lanka's tourism revenue has decreased, hoping the match boosts its economy.
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६विमानतिकिटकोलंबिया