वेल्लोर: भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा विकास होणे व शिक्षणावर जीडीपीच्या ६% खर्च करणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (व्हीआयटी) कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. व्हीआयटीच्या ४० व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. महादेवन यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४.३ कोटींवरून ८ कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी अधिक निधीची गरज आहे. काळा पैसा, करचोरी आणि भ्रष्टाचार हे देशाला जडलेले मोठे आजार आहेत. विद्यार्थ्यांनी यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठे मागे आहेत. व्हीआयटीला पहिल्या १०० किंवा २०० मध्ये आणण्याचे उद्दिष्ट आहे, डॉ. विश्वनाथन यांनी शिक्षण क्षेत्रात हे बदल सुचवले.